Admission Sakal
एज्युकेशन जॉब्स

Education : बारावीनंतर विद्यार्थ्यांना घेता येणार ‘बी.एड.’मध्ये थेट प्रवेश; डी. एड. कॉलेज यंदाही सुरूच राहणार

भविष्यात शिक्षक होण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा इंटिग्रेटेड ‘बी.एड.’चा कोर्सच करावा लागणार

सकाळ वृत्तसेवा

भविष्यात शिक्षक होण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा इंटिग्रेटेड ‘बी.एड.’चा कोर्सच करावा लागणार

सोलापूर - २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. पण, डी.एड. आणि बी.एड. कॉलेजसंदर्भात राज्य शासनाकडून कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्याने ते कॉलेज आणखी तीन-चार वर्षे पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. भविष्यात मात्र शिक्षक होण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा इंटिग्रेटेड ‘बी.एड.’चा कोर्सच करावा लागणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०३० पर्यंत पूर्णपणे लागू होईल. कौशल्य विकास, संधोशन व विद्यार्थ्यांच्या आवडीला त्यात प्राधान्य देण्यात आले आहे. यावर्षी राज्यातील १३ अकृषिक विद्यापीठात त्याची अंमलबजावणी होईल. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या न्यायाधीश जे. एस. वर्मा आयोगाच्या मते, दहा हजारांपेक्षा जास्त संख्या असलेल्या स्वतंत्र डी.एड, बी.एड महाविद्यालयांपैकी बहुतेक सर्वच ठिकाणी शिक्षकांच्या शिक्षणाचा गंभीरपणे प्रयत्न सुद्धा होत नाही. पैसे घेऊन पदव्या विकल्या जातात. आतापर्यंतचे नियामक प्रयत्न या व्यवस्थेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी तोकडे ठरले आहे. गुणवत्तेची मूलभूत मानकेसुद्धा लागू करू शकलेले नाहीत. वास्तविक पाहता या क्षेत्रातील उत्तमता आणि नाविन्यपूर्णतेची वाढ कमी करण्याचा नकारात्मक परिणाम, यामुळे झाला आहे.

त्यामुळे या क्षेत्राचे मानदंड उंचावण्यासाठी आणि सचोटी, विश्वासर्हता, कार्यक्षमता व उच्च दर्जा पुनर्स्थापित करण्यासाठी शिक्षणाचे क्षेत्र व त्याच्या प्रणालीत बदल करावा, अशी शिफारस आयोगाने शासनाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत शिक्षक होण्यासाठी चार वर्षांचा इंटिग्रेटेड (बीएड) कोर्स तयार करण्यात आला आहे.

एक, दोन अन्‌ चार वर्षांचे असणार बी.एड.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा एकात्मिक ‘बी.एड’ अभ्यासक्रम म्हणजे शिक्षण तसेच इतिहास, संगीत, गणित, संगणकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, कला, शारीरिक शिक्षण अशा एका विषयात स्पेशलायझेशन असलेली ड्यूएल मेजर सर्वांगीण पदवी असेल. तसेच शिक्षकांच्या शिक्षणात अत्याधुनिक अध्यापनशास्त्राबरोबरच समाजशास्त्र, इतिहास, विज्ञान, मानसशास्त्र, प्रारंभिक बाल्यावस्था, संगोपन व शिक्षण, पायाभूत साक्षरता, संख्याशास्त्र, भारत व त्याची मूल्ये, संस्कृती, कला, परंपरा, याचे ज्ञान व अशा इतर विषयांचे मूलभूत प्रशिक्षण देखील समाविष्ट असेल. ‘बी.एड’चा कालावधी एक (चार वर्षांचे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केलेल्यांसाठी), दोन (कोणत्याही विषयातील बॅचलरीची पदवी घेतलेल्यांसाठी) आणि चार वर्षांचा (बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी थेट) असणार आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी गुणवानांना शिष्यवृत्ती देखील दिली जाणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यंदापासून विद्यापीठात होईल. पण, डी.एड. आणि बी.एड. कॉलेज पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील. त्यात यंदा कोणताही बदल होणार नाही, पण भविष्यात निश्चितपणे बदल होईल.

- डॉ. रजनीश कामत, कुलगुरु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

SCROLL FOR NEXT