Study sakal
एज्युकेशन जॉब्स

‘लक्ष्य’भेद : अभ्यास आणि अडथळ्यांची शर्यत

आजकाल सगळ्या वयोगटात अभ्यासातील मोठा अडथळा म्हणजे स्मार्टफोन आणि त्यावर आकर्षित करत राहणारं समाजमाध्यमांचं जग.

सकाळ वृत्तसेवा

- सोनल सोनकवडे

आजकाल सगळ्या वयोगटात अभ्यासातील मोठा अडथळा म्हणजे स्मार्टफोन आणि त्यावर आकर्षित करत राहणारं समाजमाध्यमांचं जग. मी अभ्यास करत होते त्या काळात स्मार्टफोन्स नुकतेच बाजारात येऊ घातले होते. माझ्याकडे त्यावेळी साधाच फोन होता. आता अनेकांना अभ्यासासाठी स्मार्टफोन्सचा उपयोग होत असला तरी प्रत्यक्ष अभ्यास करताना लक्ष केंद्रित व्हावं आणि अधिक प्रभावीपणे अभ्यासासाठी फोनचा कमीत कमी वापर करण्याचा निश्चय करा. अभ्यासासाठी ठरवलेल्या वेळात फोनचा व्यत्यय येणार नाही याची खबरदारी घ्या. सवयीने अभ्यासाची शिस्त लागली तशीच याचीही लागेल.

अभ्यास करताना कंटाळा आला किंवा लक्ष लागत नाही म्हणून आपण ब्रेक घेतो. मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारण्याच्या नादात नकळत वेळ निघून जातो. गप्पांच्या ओघात वाहत जातो, त्यावर थोडासा ताबा ठेवणं महत्त्वाचं असतं. गप्पा, मित्र-मैत्रिणी यात कायम वेळ वायाच जातो किंवा तो टाइमपासच असतो असं मला म्हणायचं नाही. काही वेळा गप्पा मन आणि मेंदूला तजेलदार करणाऱ्या असतात. तशा अर्थाने ब्रेक गरजेचाही असतो.

परंतु अनेकदा गप्पांच्या ओघात आधी सलग बसून केलेल्या अभ्यासाची गती गमावून बसतो. या सगळ्या अडथळ्यांची शर्यत जिंकण्याचा एकच मार्ग असतो आणि तो म्हणजे ‘हा अभ्यास आपल्याला करायचाच आहे, ही परीक्षा उत्तीर्ण व्हायचीच आहे’ असा तुमचा दृढनिश्चय. सवय आणि शिस्त या दोन गोष्टींमुळे दृढनिश्चय वाढीस लागतो.

प्रत्यक्ष अभ्यास करताना काही गोष्टी निश्चित करणं आवश्यक असतं. तुम्ही काय, कसा आणि किती वेळ अभ्यास करणार आहात याच्याइतकंच महत्त्वाचं असतं तुम्ही अभ्यास कुठे करणार आहात. याचं प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असतं. कुणाचा बेडवर झोपून अभ्यास होतो, तर कुणाचा इतरांबरोबर वाचनालयात बसून होतो.

मानसशास्त्र असं म्हणतं की, तुम्ही दिवसातील ठराविक तास आणि ठराविक वेळी अभ्यास करण्याची सवय मेंदूला लावल्यास तो तुम्हाला दिवसातल्या त्यावेळी आणि तितके तास अभ्यास करण्यासाठी उद्युक्त करत राहतो. अशाच पद्धतीने तुमचा अभ्यास कुठल्या जागी चांगला होतो हे निश्चित केल्यास त्या ठिकाणी दिवसातल्या त्या वेळी आणि ते ठराविक तास अभ्यास केल्यास तो प्रभावी ठरण्याची शक्यता जास्त असते.

दिवसातले कुठले ठराविक तास अभ्यास चांगला होतो हे जाणून घ्या. काही लोक सकाळी लवकर उठून अभ्यास करू शकतात, तर काही रात्री जागून अभ्यास करतात. अभ्यासाला दिवसातील कोणती वेळ योग्य आहे हे ज्याचे त्याने ठरवावं. याबरोबरच आपला अभ्यास नक्की कुठे आणि कसा बसल्याने चांगला होतो हे निश्चित करायला शिका.

प्रत्यक्ष अभ्यास सुरू केल्यावर आपलं लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी घडत असतात. घरी असलो तर बेल वाजते, टीव्ही सुरू असतो, मोबाईल फोन बाजूला असेल तर त्यावर सतत मेसेजेस येत राहतात आणि आपलं लक्ष विचलित होतं. त्यामुळे अभ्यासाची जागा निश्चित करताना या किंवा अशा कोणत्याही गोष्टीने आपलं लक्ष विचलित होणार नाही किंवा अगदी खंड पडला तरी तो कमीत कमी कालावधीसाठी असेल याची काळजी घ्या. तुम्ही अभ्यासाला बसत असाल तिथे समोर भिंत असावी. लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

(लेखिका ‘आयआरएस’ अधिकारी, गीतकार, गायिका आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT