SSC Exam
SSC Exam Sakal
एज्युकेशन जॉब्स

SSC Exam : दहावी परीक्षेची सुरळीतरित्या सांगता

मिलिंद देसाई

दहावीच्या परीक्षेची सोमवारी विज्ञान विषयाच्या पेपरने सुरळीतरित्या सांगता झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षण खात्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बेळगाव - दहावीच्या परीक्षेची (SSC Exam) सोमवारी विज्ञान (Science) विषयाच्या पेपरने (Paper) सुरळीतरित्या सांगता झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह (Students) शिक्षण खात्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंदोत्सव साजरा केला.

दहावीच्या परीक्षेला २८ एप्रिलपासून सुरवात झाली होती.बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 139 केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. तसेच पहिल्या दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर पार पडला होता. त्यानंतर झालेले इतर विषय देखील सुरळीतरित्या पार पडले होते. बेळगाव शैक्षणिक जिल्हातील ३३८०७ विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र यावेळी सर्वच पेपरला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. शेवटच्या विज्ञान विषयाच्या पेपरला देखील तब्बल ४५९ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. तसेच परीक्षेला गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पहिल्यांदाच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक प्रमाणात होती.

दहावीच्या परीक्षेला सुरवात झाली झाल्यानंतर परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण खात्याकडून सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली होती. तसेच सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैर प्रकार घडलेला नाही. तसेच दहावीच्या परीक्षेत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकही विद्यार्थी डिबार झालेलं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे. दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे दहावी परीक्षा जून - जुलै महिन्यात घेण्यात आली होती. मात्र यावेळी वेळेत आणि सुरळीतरित्या पेपर पार पडल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून गेले अनेक महिने परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उसंत मिळणार आहे. त्यामुळे पेपर देऊन परीक्षा केंद्राबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह पहावयास मिळत होता.

परीक्षेच्या सांगते नंतर आता शिक्षण खात्याकडून पेपर तपासणीचे काम हाती घेतले जाणार असून २२ एप्रिल पासून शहरातील ८ परीक्षा केंद्रावर पेपर तपासणीचे काम सुरू होणार आहे.

प्रतिक्रिया

शाळेला सुरुवात झाल्यापासून परीक्षेची तयारी करीत होती. त्यामुळे पेपरच्यावेळी कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. त्यामुळे परीक्षेत चांगले मिळतील असा विश्वास आहे.

- नाजीना निजमीन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT