SSC Result 2021
SSC Result 2021 esakal
एज्युकेशन जॉब्स

JHT, CHSL, JE परीक्षांचा निकाल 'या' दिवशी होणार जाहीर!

बाळकृष्ण मधाळे

SSC Result 2021 : कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission, SSC) विविध परीक्षांच्या निकालांची तारीख काल सायंकाळी म्हणजेच, 6 जुलै 2021 रोजी जाहीर केलीय. यानुसार, कनिष्ठ हिंदी ट्रान्सलेटर (Junior Hindi Translator), कनिष्ठ ट्रान्सलेटर (Junior Translator) आणि सीनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा-2020 द्वितीय पेपरचा निकाल (Senior Hindi Translator Examination, 2020 Paper-II Result) 15 जुलै 2021 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यासह उच्च माध्यमिक (10 + 2) स्तरीय परीक्षेचा (2018) अंतिम निकाल व उच्च माध्यमिक (10 + 2) स्तरीय परीक्षा-2019 श्रेणी II चा निकाल 30 रोजी जाहीर केला जाणार आहे. (SSC Result 2021 SSC Has Released The For Declaration Of Results For Junior Hindi Translator Junior Translator Result Date 2021 Check On ssc nic in)

कर्मचारी निवड आयोगाने विविध परीक्षांच्या निकालांची तारीख नुकतीच जाहीर केली आहे.

एसएससीने या संदर्भात (ssc.nic.in) या वेबसाइटवरती अधिसूचना जारी केलीय. दरम्यान, परीक्षेस बसलेले सर्व उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर अधिसूचना देखील वाचू शकतात. त्याचबरोबर, अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ अभियंता सिव्हिल, मॅकेनिकल परीक्षा द्वितीयचा निकाल 30 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

SSC Result 2021 : ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटरसह विविध परीक्षांचे निकाल असे तपासा

कनिष्ठ हिंदी ट्रान्सलेटर आणि सीनियर हिंदी ट्रान्सलेटर यासह इतर परीक्षांचे निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना एसएससीच्या अधिकृत साइटला ssc.nic.in भेट द्यावी लागेल. त्यानंतर होम पेजवर रिझल्ट लिंकवर क्लिक करावे लागेल. आता आपल्यासमोर एक नवीन पीडीएफ फाइल उघडेल, जिथे उमेदवार त्यांचे निकाल तपासू शकतात. त्यानंतर फाइल डाउनलोड देखील करु शकतात. दरम्यान, आयोगाने विविध परीक्षांचे वेळापत्रक पुन्हा जाहीर केले असून यानुसार, दिल्ली पोलीस, सीएपीएफ (CAPFs) मधील उपनिरीक्षक आणि सीआयएसएफ (CISF) सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा (पेपर -2) 2019 विविध परीक्षा केंद्रांवर 26 जुलै 2021 रोजी घेण्यात येणार आहे.

SSC Result 2021 SSC Has Released The For Declaration Of Results For Junior Hindi Translator Junior Translator Result Date 2021 Check On ssc nic in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून दोन उमेदवारांची चर्चा

SCROLL FOR NEXT