ssc marksheet  sakal media
एज्युकेशन जॉब्स

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार गुणपत्रिका; मंडळाकडून नियोजन पूर्ण

नरेश शेंडे

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल (ssc result) 16 जुलै रोजी जाहीर केला होता, त्या निकालानंतर आता मंडळाकडून (education board) तब्बल 24 दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना (students) आपल्या हातात गुणपत्रीका पडणार आहेत. या गुणपत्रिका वितरित (ssc marksheets) करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आज मंडळाकडून देण्यात आली. ( ssc students will get marksheets on ninth augast-nss91)

दहावीची विद्यार्थ्यांना येत्या 9 ऑगस्टला शाळांमधून गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे. शाळांनी कोरोनासंबंधित राज्य सरकारच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना दुपारी 3 वाजल्यापासून त्यांच्या सोईनुसार गुणपञिका वितरीत कराव्यात अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांना दिल्या आहेत.

काही कारणास्तव विद्यार्थ्यांचा निकाल न मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांबाबत शाळांनी लेखी स्वरूपात तातडीने विभागीय ़शिक्षण मंडळाकडे संपर्क साधावा, असे मुंबई विभागीय शिक्षण मंडळ सचिव राजेंद्र अहिरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी गुणपञिका नेण्यासाठी शाळांकडे ठराविक तारखेचा आग्रह धरू नये, अशा सूचनाही अहिरे यांनी दिल्या आहेत.

राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत असलेल्या 22 हजार 767 शाळांतून एकुण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी पास झाले आहेत, निकाल जाहीर झाल्यानंतर या लाखो आपली मूळ गुणपत्रिका केव्हा मिळेल यासाठीची प्रतीक्षा लागली होती. मात्र दहावीच्या निकालानंतर मंडळातील विविध कामकाजाच्या दिरंगाईमुळे आता तब्बल 24 दिवसानंतर या गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: अंजनगावात तणाव! लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन, आमदार अभिजित पाटील गावात दाखल

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी २०२७ चा वर्ल्ड कप खेळायला हवा का? युवराज सिंगचं परखड मत; म्हणाला, मला आदर मिळाला नाही, तो...

"फिजिकल रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट आहे का?" कंगनाने रणबीर कपूरला थेट विचारलं होतं... काय आहे किस्सा?

PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग मध्ये नवा वाद; डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्या भांडणाचा Video Viral

Railway: मध्य रेल्वेकडून उन्हाळी सुट्ट्यांची भेट, मुंबईतून ४६ विशेष गाड्या धावणार, पाहा वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT