student take admission in this field most arts science commerce reduce in engineering  sakal
एज्युकेशन जॉब्स

पारंपारिक शाखांतील नव्या अभ्यासक्रमांकडे कल

विद्यार्थ्यांचा ओढा वाढला; व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना पसंती

सम्राट कदम

पुणे : बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम म्हटले की, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्याचा ओढा जास्त असतो. तरी गेल्या काही वर्षांत या काही शाखांमध्ये वाढलेला कल कमी झाल्याचे दिसून येत आहे. अभियांत्रिकीच्या राज्यात अनेक जागा रिक्त राहत असून, विद्यार्थ्यांचा कल आता विज्ञान, वाणिज्य, कला या पारंपरिक शाखांमधील नवीन रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांकडे वाढला आहे.

वाणिज्य शाखा

बारावीला सरासरी गुण पडले आणि गणित चांगले असले की विद्यार्थी वाणिज्य शाखेला प्रवेश घ्यायचे. आता ही परंपरा मोडीत निघाली असून, अधिक उद्योगान्मूख विद्याशाखा म्हणून वाणिज्य शाखेकडे पाहिले जात आहे. कंपन्या, वित्त संस्था आणि इ-कॉमर्समुळे या शाखेची रोजगारक्षमता वाढली असून, बारावीनंतर तब्बल १७ ते २० प्रकारचे नवे अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहे. सी.ए.,आयसीडब्ल्यूए, सी.एस., बँकिंग फायनान्स, कन्सल्टंट, विमा, विपणन, जाहिरात, डिजिटल मार्केटिंग, इंपोर्ट, एक्स्पोर्ट यांसह वेगवेगळे असे २० हून अधिक अभ्यासक्रमांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण उपलब्ध आहे. त्यानंतर नोकरीबरोबरच व्यवसायाच्याही अनेक संधी असतात.

विज्ञान शाखा

रोजगार देणारी पारंपारिक विद्याशाखा म्हणून विज्ञान शाखेकडे पाहिले जात आहे. आता यामध्येही अनेक नवीन अभ्यासक्रमांचा अंतर्भाव झाला असून, विद्यार्थ्यांचा कलही वाढला आहे. आयओटी (इंटरनेटऑफ थिंग्स), स्टॅस्टेटि्कस (पायथॉन प्रोग्रॅमिंग), मॅथ्समध्ये मॅथलॅब, पायथॉन प्रोग्रॅमिंग, इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, रोबोटिक्स, उपकरणशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवमाहितीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्र, वैद्यकीय जीवशास्त्र, बीसीए, कॉंप्युटर सिम्यूलेशन्स, ग्राफिक्स, आदी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल.

संगणकाचे ज्ञान असलेल्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्याला आजकाल सहज नोकरी मिळते. पुरवठा साखळी व्यवस्थापन, कंपन्यांच्या बॅक एंडचे काम, आयटीशी निगडित नोकरी आणि इ-कॉमर्समुळे वाणिज्य शाखेची रोजगार देण्याची क्षमता वाढली आहे. उद्योगांची गरज ओळखून तोडीस तोड अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. तसेच बीबीए, बीबीए इन आयबी, बीबीए सीए अशा नव्या अभ्यासक्रमांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

- डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

अभियांत्रिकीबरोबरच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आवश्यक व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. बीएस्सी, बीसीए, बीसीएस आदी अभ्यासक्रमांना ग्रामिण भागापासून शहरापर्यंत मागणी आहे. विद्यापीठ आवारातील विभागांबरोबरच महाविद्यालयांमध्येही नवे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू झाले आहे.

- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT