MPSC News sakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC News : निकाल रखडल्याने विद्यार्थी संभ्रमात ; कर सहाय्यक, लिपिक पदाची परीक्षा होऊन उलटले चार महिने

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या कर सहाय्यक आणि लिपिक पदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल चार महिन्यांपासून रखडला आहे. निकालाची अनिश्चितता आणि पुढील परीक्षेच्या तयारीच्या नियोजनाबद्दल विद्यार्थी संभ्रमात असून लांबलेल्या निकालामुळे चिंतेचे वातावरण आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या कर सहाय्यक आणि लिपिक पदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल चार महिन्यांपासून रखडला आहे. निकालाची अनिश्चितता आणि पुढील परीक्षेच्या तयारीच्या नियोजनाबद्दल विद्यार्थी संभ्रमात असून लांबलेल्या निकालामुळे चिंतेचे वातावरण आहे. आयोगाने प्रलंबित परीक्षेचा निकाल जाहीर करून कौशल्य चाचणीची तारीख जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

‘एमपीएससी’तर्फे एकूण सात हजार ५०२ पदांसाठी कर सहाय्यक आणि लिपिक संवर्गासाठी परीक्षा घेतली होती. १७ डिसेंबरला मुख्य परीक्षा झाली. पूर्व परीक्षा होऊन जवळजवळ एक वर्ष आणि मुख्य परीक्षा होऊन चार महिने होत आले; तरीही परीक्षेचा निकाल जाहीर झाला नाही. लोकसभा निवडणुकांमुळे आयोगाने विविध परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा केव्हा होणार याबाबत कोणतेही संकेत नाहीत. आयोगाने वापरलेला यथावकाश शब्द विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसवणार आहे.

परीक्षा दृष्टिक्षेपात

  • कर सहाय्यकांची पदे : ४६८

  • लिपिक संवर्गाची पदे : ७,०३४

  • भरतीची जाहिरात : २० जानेवारी २०२३

  • पूर्व परीक्षा : ३० एप्रिल २०२३

  • मुख्य परीक्षा : १७ डिसेंबर २०२३

एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या सर्वांत मोठ्या पदभरती परीक्षांपैकी ही एक आहे. वेळेवर निकाल जाहीर होत नसल्याने संभ्रमावस्था आहे. निकाल लांबणे, परीक्षा पुढे ढकलणे आदी कारणांमुळे विद्यार्थ्यांची मानसिक, आर्थिक आणि सामाजिक कुचंबणा होते.

— महेश बढे, एमपीएससी स्टुडंट राईट्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT