NEP Education sakal
एज्युकेशन जॉब्स

Education : पदवीच्या प्रवेशापूर्वी करा एनईपीचा अभ्यास

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमापासून एनईपी लागू होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बारावीच्या परीक्षांनंतर विद्यार्थ्यांना वेध लागतात ते पुढल्या प्रवेशांचे. कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा, कोणतं महाविद्यालय निवडायचं किंवा कोणत्या शहरात उच्च शिक्षण घ्यायचे... असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतात. पण यंदा जर तुम्ही पदवीला प्रवेश घेणार असाल तर नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा नक्की अभ्यास करा. कारण पदवी आता चार वर्षांची होत असून, तुम्ही निवडलेल्या विषयांमुळे तुमचे करिअर घडणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमापासून एनईपी लागू होत आहे. त्यामुळे पदवी आता चार वर्षांची होणार असून, आंतरविद्याशाखीय अभ्यासाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल. आंतरवासिता (इंटर्नशिप), हँड्स ऑन ट्रेनिंग, ऐच्छिक विषय, मल्टिपल एन्ट्री- मल्टिपल एक्झिट, ॲकॅडमिक बॅंक ऑफ क्रेडिट्स, अशा एक ना अनेक नव्या संकल्पना पदवीच्या अभ्यासक्रमांत अंतर्भूत झाल्या आहेत.

आजवर अभ्यासक्रम किंवा महाविद्यालयाभिमूख असलेले शिक्षण आता विद्यार्थी केंद्रित असणार आहे. विद्यार्थ्याने निवडलेले विषय, औद्योगिक कार्यानुभव, प्राप्त केलेल श्रेयांक आणि त्यातून मिळालेली कौशल्य त्याच्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

विद्यार्थ्यांनी काय करावे?

- एनईपीतील नव्या बदलांची माहिती घ्यावी. महाविद्यालयांच्या माहिती पुस्तिकेत त्याचा अंतर्भाव आहे का, हे तपासावे.

- आपल्याला ज्या श्रेत्रात करिअर करायचे आहे, त्याला पूरक अभ्यासक्रम निवडावा.

- त्याच क्षेत्रातील आधुनिक व सुसंगत इंटर्नशिप देणाऱ्या महाविद्यालयांची चौकशी करावी

- दर्जेदार ऐच्छिक विषय, आंतरवासिता आणि हॅंड्स ऑन ट्रेनिंग उपलब्ध असलेल्या महाविद्यालयांना प्राधान्य द्यावे

- संबंधित महाविद्यालयातील एनईपी कक्षाला भेट देऊन, अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती मिळवावी

महाविद्यालयांना त्यांच्या माहिती पुस्तिकेमध्ये एनईपीच्या वैशिष्ट्यांचा अंतर्भाव असावा. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सहाय्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात एनईपीकक्षाची रचना करायला सांगितले आहे. पदवीच्या प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांनी एनईपीबद्दल माहिती घेणे गरजेचे आहे.

- डॉ. नितीन करमळकर, अध्यक्ष, राज्य सुकाणू समिती, एनईपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT