teachers. esakal
एज्युकेशन जॉब्स

शिक्षक भरतीसाठी शासनाचा नविन नियम ; अश्या आहेत अटी

मिलिंद देसाई

बेळगाव : खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांची भरती करताना शिक्षण खात्याकडून परवानगी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच शिक्षक भरती करतेवेळी स्थानिक वृत्तपत्रामध्ये माहिती देणे बंधनकारक असणार आहे.

राज्यातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्या दृष्टीने शिक्षण खात्याने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच बरोबर आता खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर देखील शिक्षकांची भरती केली जाणार आहे.

राज्यातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र शिक्षक भरती करण्यापूर्वी सर्व अनुदानित शाळांनी शिक्षण खात्याकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी. यासाठी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन शिक्षक भरतीची माहिती देणे गरजेचे असल्याचे सर्व शाळांना कळविण्यात आले आहे.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासह राज्यातील अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या जगा लवकर भरती कराव्यात अशी मागणी सातत्याने खाजगी शिक्षण संस्थांकडून होत आहेत. मात्र शिक्षक भरतीला सातत्याने विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भाषिक अल्पसंख्यांकांच्या शाळांना रोस्टर लागू करण्यात आल्याने अनेक वर्षे शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे भाषिक अल्पसंख्यांक शाळांना देखील शिक्षकांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे शिक्षक भरती करण्यास लवकर हिरवा कंदील दाखवा असे मत व्यक्त होऊ लागले आहे.

शिक्षक भरती करण्यापूर्वी संबंधित खाजगी अनुदानित शाळांनी शिक्षण खात्याकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. असे कळविण्यात आले आहे. शिक्षक भरतीचा निर्णय झाल्यानंतर सर्व शाळांना ही माहिती द्यावी लागणार आहे.

अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin September Installment : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा; 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

New Kabaddi Rules Changes 2026 : कबड्डीचे नियम बदलले! आता बदली खेळाडू आणि लॉबीच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या कबड्डीचे नवीन 6 नियम

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयामागे धोनीचा हात? शाय होपने उघडलं राज; म्हणाला, ‘माहीने मला हेच सांगितलं होतं...’

SCROLL FOR NEXT