results sakal
एज्युकेशन जॉब्स

Teacher Recruitment Exam Result : ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी’ परीक्षेचा निकाल जाहीर

शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ (टेट) या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ (टेट) या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

पुणे - राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ (टेट) या परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने टेट परीक्षा घेण्यात आली. राज्य परीक्षा परिषदेने दोन लाख १६ हजार ४८३  उमेदवारांचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर होणार, याबाबत राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर आदल्या दिवशी माहिती देण्यात आली होती. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत होते.

मात्र, संध्याकाळ झाली तरीही निकाल जाहीर न झाल्याने उमेदवार काहीसे हताश झाले होते. दरम्यान परीक्षा परिषदेने शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास निकाल जाहीर केला.

या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांची गुण यादी परीक्षा परिषदेच्या ‘www.mscepune.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेल अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

ढिंग टांग : पंख असलेला माणूस..!

आजचे राशिभविष्य - २ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT