Teachers object to Balbharti survey Demand to provide textbooks instead of leaflets aurangabad education sakal
एज्युकेशन जॉब्स

पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने लावणे निरर्थक

बालभारतीच्या सर्वेक्षणाला शिक्षकांचा आक्षेप ः पाने लावण्याऐवजी स्वाध्याय पुस्तिका देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने शालेय पाठ्यपुस्तकांनाच वह्यांची पाने जोडण्याबाबत विचार सुरु केला आहे. हा विचार प्रत्यक्षात किती व्यवहार्य आहे, यावरून ‘बालभारती’मार्फत एक सर्वेक्षण सुरु केले आहे. मात्र, शिक्षकांनी हा निर्णय निरर्थक असल्याचे मत व्यक्त केले आहे. बालभारतीने https://academics.balbharati.in/notebook या लिंकवर एक प्रश्नावली अपलोड केली आहे. त्यात पुस्तकांमध्ये वह्यांची पानं लावली तर ती किती असावीत? कोणत्या इयत्तेसाठी किती असावीत? कोणत्या विषयांत किती असावीत? विद्यार्थ्यांना या पानांचा खरेच उपयोग होईल का? अभ्यास करताना विद्यार्थी यात नोंदी करतील का? यामुळे वह्यांचा वापर थांबेल का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले आहेत. गोरगरिबांच्या मुलांना वह्या विकत घेणे परवडत नसल्याने शिक्षणात अडथळे येतात. यासाठीच शासन स्तरावर नवी योजना आणण्यावर विचार सुरु आहे.

विद्यार्थ्यांसाठी तळमळीने काम करणाऱ्या शिक्षकांनी ही प्रश्नावली भरून द्यावी, असे आवाहन बालभारतीने केले आहे. परंतु, शिक्षण क्षेत्रातील जाणकार शिक्षक ॲक्टिव्ह टीचर्स फोरमचे भाऊसाहेब चासकर यांनी व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये चर्चेतून या उपक्रमाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

शिक्षकांचे आक्षेप व मागण्या

  • पाठ्यपुस्तक अधिक कोऱ्या पानांची संख्येमुळे पृष्ठसंख्या वाढेल. परिणामी, पाठ्यपुस्तक जाडजूड झाल्याने दप्तराचे ओझे वाढेल.

  • पाठ्यपुस्तके पुढील वर्षीच्या किंवा त्यानंतरही मुलांना वापरता येतात. लिहून खराब झालेले पाठ्यपुस्तक आनंदाने वापरले जाण्याची शक्यता कमी दिसते.

  • द्यायच्या तर मुलांना कोऱ्या वह्या पुरवा. वह्या नकोत तर मग स्वाध्याय पुस्तिका द्या. घरच्या अभ्यासासाठी याची जास्त आवश्यकता आहे.

  • स्वाध्याय पुस्तिका स्वतंत्रपणे देणे हाच सर्वात चांगला पर्याय आहे. शासनाने यावर गांभीर्याने विचार करावा.

  • गणितासाठी चौकटीच्या आणि इतर विषयांसाठी शासनाने रेघेच्या वह्या द्याव्यात.

  • वह्या आणि कागदांचा वापर मुले त्यांच्या मनाप्रमाणे करत असतात. अपेक्षित तितक्याच नोंदी मुले कशा करतील?

पुस्तकांत कोरी पाने देण्याचा, पाठ्यपुस्तकात जोडून वह्यांची पाने लावण्याचा निर्णय खरे तर विद्यार्थ्यांना अडचणींचा, अडथळ्यांचा, त्रासदायकच ठरणार आहे. अतिशय घातकी, चुकीचा, अत्यंत तर्कहीन निर्णय आहे. हा निर्णय झाला असेल तर शासनाने तो तातडीने मागे घ्यायला हवा यातच विद्यार्थ्यांचे भले आहे.

-राजेश हिवाळे,जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT