Students Sakal
एज्युकेशन जॉब्स

CBSE दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा महत्त्वाच्या गोष्टी!

सीबीएसई दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा महत्त्वाच्या गोष्टी!

श्रीनिवास दुध्याल

सहसा सीबीएसई दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा मार्चमध्ये घेतल्या जातात; परंतु यावर्षी कोरोनामुळे सीबीएसई बोर्ड दोन सत्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेत आहे.

सोलापूर : सीबीएसई (CBSE) दहावी व बारावी टर्म-1 परीक्षेची डेटशीट आज बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जारी केली जाईल. सहसा सीबीएसई दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा मार्चमध्ये घेतल्या जातात; परंतु यावर्षी कोरोनामुळे (Covid-19) सीबीएसई बोर्ड दोन सत्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेत आहे. टर्म वन परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार आहे व टर्म - दोन च्या परीक्षा मार्चमध्ये होणार आहेत. सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येतील.

या 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

  1. सीबीएसई दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्गाची डेटशीट फक्त अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावी. मंडळाची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आहे.

  2. तुमच्या शाळेच्या शिक्षकांसोबत CBSE डेटशीटची पडताळणी करा. अपडेट्‌स नेहमी सोशल मीडियावरील व्हेरिफाइड अकाउंटवरच पाहा.

  3. हिवाळ्यामुळे या वेळी परीक्षा सकाळी 10.30 ऐवजी 11.30 वाजता सुरू होईल.

  4. परीक्षेमध्ये ऐच्छिक प्रश्न विचारले जातील जे 90 मिनिटांसाठी असतील. अभ्यासक्रमाशी संबंधित 50 टक्के प्रश्‍न असतील.

  5. सीबीएसई बोर्डाने सांगितले की, प्रथम किरकोळ विषयांच्या परीक्षा असतील, त्यानंतर मुख्य विषयांच्या परीक्षा होतील.

  6. सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांऐवजी 20 मिनिटे दिली जातील.

  7. टर्म परीक्षा संपण्यापूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा होईल.

  8. दहावी व बारावीचा अंतिम निकाल दुसऱ्या टर्मची परीक्षा संपल्यानंतरच जाहीर केला जाईल.

  9. टर्म -1 परीक्षेत कोणत्याही विद्यार्थ्याला पास, कंपार्टमेंट किंवा अत्यावश्‍यक पुनरावृत्ती श्रेणीत ठेवण्यात येणार नाही.

  10. सीबीएसई बोर्ड टर्म 1 परीक्षेच्या गुणांचा वापर सीबीएसई बोर्ड 2022 चा अंतिम निकाल तयार करण्यासाठी केला जाईल.

सीबीएसईने सप्टेंबर महिन्यातच दहावी आणि बारावी (2021-22 सत्र) टर्म 1 परीक्षेसाठी नमुना पेपर आणि मार्किंग योजना जारी केली होती. या नमुना कागदपत्रांच्या मदतीने विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांच्या मार्किंग योजनेविषयी माहिती मिळेल, जे त्यांच्या बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी खूप मदत करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT