Students exam esakal
एज्युकेशन जॉब्स

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना समुपदेशक देणार आधार

परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात.

मीनाक्षी गुरव - सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये, यासाठी ऑनलाइन समुपदेशन करण्यात येणार आहे. यासाठी राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य मंडळाने नियुक्त केलेल्या समुपदेशकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकांची यादी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक हे परीक्षा कालावधीत सकाळी आठ ते रात्री आठ या वेळात विद्यार्थ्यांना निःशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र, विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबंधित प्रश्न याबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT