Students exam esakal
एज्युकेशन जॉब्स

Exams: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल, तर बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

मीनाक्षी गुरव

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना याआधी झालेल्या क्रीडा स्पर्धेतील सहभागाचा विचार करता शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, अशी सूचना राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रकटनाद्वारे केली आहे. (SSC and HSC Sudent Exam Updates)

मंडळाच्या वतीने दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल, तर बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २१ फेब्रुवारीला केलेल्या सूचनेनुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचा इयत्ता सातवी आणि आठवीमधील क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा आणि या विद्यार्थ्यांना २०२१-२२ करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत.

तसेच बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बारावीपूर्वी इयत्ता नववी आणि दहावीमधील क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा आणि त्याप्रमाणे सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत. क्रीडा गुणाची सवलत ही केवळ २०२१-२२ च्या परीक्षेकरिताच असणार आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी नोंद घ्यावी, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना असे मिळणार क्रीडा सवलतीचे गुण :

दहावी : इयत्ता ७वी आणि ८ वीमध्ये असताना क्रीडा स्पर्धेतील सहभागाचा होणार विचार; त्यानुसार मिळणार गुण

बारावी : इयत्ता ९वी आणि १०वीमध्ये असताना क्रीडा स्पर्धेतील सहभागाचा होणार विचार; त्यानुसार मिळणार गुण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी घसरले, कोणते शेअर्स वाढले?

Tilak Varma Diagnosed with Rhabdomyolysis: हातातून बॅट सुटली असती! तिलक वर्माने उघड केले 'ऱ्हॅब्डोमायोलिसिस'चे गुपित; काय आहे हा जीवघेणा स्नायूंचा आजार?

क्रृर नजर, बदल्याची आग! सिद्धार्थ जाधवचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमातील आक्राळ विक्राळ लूक व्हायरल

Weather IMD Alert : राज्यासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे! मुंबईसह 'या' २६ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, कसं असणार हवामान?

Gold & Silver Prices : दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण, पण पुन्हा सोन्याचे दर वाढणार

SCROLL FOR NEXT