biotechnology sakal
एज्युकेशन जॉब्स

बायोटेक्नॉलॉजीचा वाढता प्रभाव

मानवाच्या सुखांसाठी आणि सध्याच्या परिस्थितीतील आव्हानांचा सामना करत अधिक सुरळीतपणे जगता यावे यासाठी बायोलॉजीमध्ये तंत्रज्ञानाने केलेला सकारात्मक हस्तक्षेप म्हणजे बायोटेक्नॉलॉजी.

सकाळ वृत्तसेवा

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

मानवाच्या सुखांसाठी आणि सध्याच्या परिस्थितीतील आव्हानांचा सामना करत अधिक सुरळीतपणे जगता यावे यासाठी बायोलॉजीमध्ये तंत्रज्ञानाने केलेला सकारात्मक हस्तक्षेप म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. ‘लाइफ सायन्सेस’मधील ही अत्यंत नवीन आणि आधुनिक शाखा मानली जाते. तसे असले, तरी फार पूर्वीपासून माणूस बायोटेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. दुधाचे दही करण्याच्या प्रक्रियेपासून हा प्रवास सुरू झालेला आहे.

आज विविध औषधे, लसनिर्मितीपासून जेनेटिक इंजिनिअरिंग, क्लोनिंगपर्यंत असंख्य सेवा-उत्पादनांमध्ये आणि शेती, आरोग्य, औषधनिर्माण, औद्योगिकजगत, बायोफ्युएल्ससारख्या विविध क्षेत्रांमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा प्रभाव पाहायला मिळतो.

शिक्षण व्यवस्था

बीएसस्सी बायोटेक्नॉलॉजीसह अन्य पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. संबंधित पदवीनंतर मॉलेक्युलर बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, स्टेम सेल रीसर्च, जेनेटिक इंजिनिअरिंग, बायोइन्फॉर्मेटिक्स अशा विविध स्पेशलायझेशनमध्ये शिक्षण घेता येते.

कालावधी व पात्रता

बीएसस्सी बायोटेक्नॉलॉजी हा बारावी विज्ञान शाखेनंतरचा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. काही ठिकाणी बीएसस्सी ‘ऑनर्स’ हा चार वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीसह बारावी विज्ञान शाखा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी बारावीच्या गुणांच्या निकषावरील मेरीटप्रमाणे प्रवेश दिला जातो. राज्यस्तरावर स्वतंत्र प्रवेशपरीक्षा नसते. मात्र, विद्यापीठ स्तरावर किंवा काही खासगी विद्यापीठे /महाविद्यालयांच्या स्वतंत्र प्रवेशपरीक्षा असू शकतात.

अभ्यासक्रमाचे स्वरूप

सेल स्ट्रक्चर, ऑरगॅनिक मेकॅनिझम्स, प्रिन्सिपल्स ऑफ मायक्रोबायोलॉजी, बायोफिजिक्स, ट्रान्समिशन जेनेटिक्स, इम्युनॉलॉजी, टिश्यू कल्चर, प्लांट बायोटेक्नॉलॉजी, ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी, बायोइन्फॉर्मेटिक्स, मेडिकल बायोटेक्नॉलॉजी, एथिक्स, डीएनए टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी असे विविध विषय या पदवी अभ्यासक्रमात शिकविले जातात.

बहुतांशी विषय प्रयोगशाळेशी संबंधित आहेत. या सर्वांमध्ये ‘मायक्रो स्टडी’ आहे. दैनंदिन अध्ययन प्रक्रियेत थेअरी आणि प्रॅक्टिकल्स यांचा समावेश असतो. परीक्षादेखील प्रात्यक्षिक आणि लेखी स्वरूपाच्या असतात. प्रोजेक्ट, इंटर्नशिप, इंडस्ट्री व्हिजिट्स, रिसर्च पेपर्स या माध्यमातून विद्यार्थी प्रगल्भ होणे अपेक्षित आहे.

पुढील शिक्षण

बी.एसस्सी. बायोटेक्नॉलॉजीनंतर एम.एसस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम.बी.ए. बायोटेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बायोइन्फॉर्मेटिक्स, एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी, एम.एस्सी. बायोइन्फॉर्मेटिक्स, एमएस्सी बॉटनी/झूलॉजी अशा प्रकारचे शिक्षण घेता येते. याव्यतिरिक्त विविध स्पेशलायझेशनमध्ये मास्टर्स करता येते.

नोकरी कुठे?

संशोधन संस्था, केमिकल निर्मिती, क्लिनिकल रिसर्च, औषध निर्माण, हॉस्पिटल्स, फूड प्रोसेसिंग, खत निर्मिती, शासकीय आणि खासगी प्रयोगशाळा, कॉस्मेटिक्स आदी ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीचे तज्ज्ञ काम करतात. यासोबतच इकॉलॉजी, सॉइल बायोलॉजी या क्षेत्रांत मोठे काम आहे. कन्सल्टेशनच्या माध्यमातून सल्ला देण्याचे काम आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापनाचे काम करता येते.

नोकऱ्यांची संख्या इंजिनिअरिंगप्रमाणे मोठ्या प्रमाणात नसते, परंतु संशोधकीय वृत्ती असणाऱ्यांना उत्तम करिअर संधी मिळतात. हे खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल करिअर’ आहे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर शासकीय आस्थापनांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध असतात.

पदे

बायोटेक्नॉलॉजिस्ट, क्लिनिकल रिसर्चर, लॅब टेक्निशियन, मॉलेक्युलर बायोलॉजिस्ट, बायोकेमिस्ट, मेडिकल सायंटिस्ट, मायक्रोबायॉलॉजिस्ट, बायो स्टॅटिस्टिशियन आदी पदांपर्यंत मजल मारता येते. उच्च शिक्षण घेतल्यास संशोधक आणि वरिष्ठ जबाबदाऱ्या मिळतात.

पुढील स्कोप

लोकसंख्या जशी वाढते, तसे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अन्नधान्याची मोठी समस्या आहे. आरोग्याच्या दृष्टीने पाहता विविध व्याधी, आजार आपल्यासमोरची आव्हाने आहेत. यातील अनेक प्रश्नांना उत्तरे देण्याची क्षमता बायोटेक्नॉलॉजीमध्ये आहे. ॲन्झायमॉलॉजी, नॅनो बायोटेक्नॉलॉजी, फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीसह विविध क्षेत्रांमध्ये आता संशोधकांची आणि तज्ज्ञांची गरज आहे. बी.एस्सी.नंतर उच्च शिक्षण घेतल्यास प्रज्ञावंतांना भविष्यात नक्कीच स्कोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Padma Awards 2026: राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान; भगतसिंह कोश्यारी, दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा समावेश

Chanakya Life Guide : 'या' 2 सवयींमध्ये बदल केल्यास तुम्हाला कोणच फसवू शकणार नाही

Bullet Train: बुलेट ट्रेनच्या भुयारी मार्गाला वेग! २१ किमी बोगद्यासाठी दुसरी 'टीबीएम' घणसोलीत दाखल

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह उफाळला! शिंदे सेनेत बंडाची चाहूल; वाढत्या असंतोषामुळे नेते भाजपच्या वाटेवर?

Rain Alert: संभाजीनगरात अवकाळी वादळाचा तडाखा! पावसासह वादळी वाऱ्यांचा कहर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT