आरोग्य विभागाची परीक्षा MPSC मार्फत घ्या! प्रवेशपत्रावर पुन्हा चुका Canva
एज्युकेशन जॉब्स

आरोग्य विभागाची परीक्षा MPSC मार्फत घ्या! प्रवेशपत्रावर पुन्हा चुका

आरोग्य विभागाची परीक्षा MPSC मार्फत घ्या! प्रवेशपत्रावर पुन्हा चुका

तात्या लांडगे

शुक्रवारपासून आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र वितरीत केले जात आहेत. परंतु, हॉल तिकिटावर पुन्हा चुका झाल्या असून एकाच उमेदवाराला दोन परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत.

सोलापूर : सावर्जनिक आरोग्य विभागातील (Department of Public Health) गट 'क' व 'ड' संवर्गाची नऊ हजार 657 पदांची भरती (Recruitment) होणार आहे. 'न्यासा' या संस्थेतर्फे ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेशपत्रातील घोळामुळे ऐनवेळी रद्द झालेली परीक्षा (Exam) आता 24 ऑक्‍टोबर व 31 ऑक्‍टोबरला घेतली जाणार आहे. शुक्रवारपासून त्यासाठीचे प्रवेशपत्र वितरीत केले जात आहेत. परंतु, हॉल तिकिटावर पुन्हा चुका झाल्या असून एकाच उमेदवाराला दोन परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत.

आरोग्य विभागाच्या नऊ हजार 657 पदांसाठी तब्बल आठ लाख 12 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. 24 ऑक्‍टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी चार लाख पाच हजार उमेदवार बसतील. तर 31 ऑक्‍टोबर रोजी होणारी परीक्षा चार लाख सात हजार उमेदवार देतील. त्यांच्यासाठी परीक्षा केंद्रांची यापूर्वीच निवड करण्यात आली आहे. दरम्यान, डिसेंबर 2021 पर्यंत रिक्‍त होणाऱ्या पदांचा अंदाज घेऊन ही पदभरती केली जात आहे. उमेदवारांना नाहक त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यासंदर्भात कंपनी व्यवस्थापकांना राज्य सरकारमार्फत सूचना करण्यात आली आहे. "न्यासा' कंपनीच्या प्रत्येक कार्यवाहीवर नजर ठेवल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी वशिलेबाजीच्या कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवारांची निवड होईल, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मात्र, हॉल तिकिटावर पुन्हा चुका आहेतच. या पार्श्‍वभूमीवर ही परीक्षा "एमपीएससी'मार्फत (MPSC) राबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तरी, ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क व ड संवर्गातील पदांसाठी 24 व 31 ऑक्‍टोबरला तीन सत्रात परीक्षा होणार आहे. 24 रोजी सकाळ व दुपारच्या सत्रात तर 31 ऑक्‍टोबरला एकाच सत्रात परीक्षा होईल.

- डॉ. सतीश पवार, संचालक, राष्ट्रीय आरोग्य मिशन, मुंबई

वेटिंग लिस्टवरील उमेदवारांना पुढे संधी

कोरोनामुळे आणि निवडणुकांच्या आचारसंहितांमुळे मागील दोन वर्षांत आरोग्य विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात पदभरती होऊ शकलेली नाही. नऊ हजार 657 जागांसाठी तब्बल सव्वाआठ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. परीक्षेचा निकाल जाहीर करताना वेटिंग लिस्ट लावली जाण्याची शक्‍यता आहे. पुढील तीन-चार महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर त्या उमेदवारांची निवड केली जाऊ शकते. त्यासंदर्भात राज्य सरकार अंतिम निर्णय घेईल, असे सूत्रांनी सांगितले.

ठळक बाबी...

  • आरोग्य विभागातील गट "क' व "ड' संवर्गातील पदांची तीन सत्रात परीक्षा

  • 24 आणि 31 ऑक्‍टोबर रोजी परीक्षा घेण्याचे ठरले वेळापत्रक

  • आरोग्य विभागाच्या पदभरतीचे हॉल तिकीट देण्यास झाली सुरवात

  • "न्यासा' कंपनीच्या प्रत्येक टप्प्यांवरील हालचालीवर आरोग्य विभागाचा वॉच

  • 24 ऑक्‍टोबरला दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पहिल्या सत्रात तर पदवी, पदव्युत्तर उत्तीर्ण उमेदवारांची दुसऱ्या सत्रात परीक्षा

  • 31 ऑक्‍टोबर रोजी दहावी-बारावीतील उत्तीर्ण उमेदवारांची एकाच सत्रात होणार परीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT