Career Tips esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : महिलांसाठी बेस्ट आहेत 'हे' करिअर ऑप्शन्स, जाणून घ्या ‘या’ कोर्सेसबद्दल

आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक महिला काम करत आहेत. असे कोणतेही क्षेत्र नाही की, जिथे महिला कार्यरत नाहीत.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक महिला काम करत आहेत. असे कोणतेही क्षेत्र नाही की, जिथे महिला कार्यरत नाहीत. अगदी बांधकाम क्षेत्रापासून ते वैज्ञानिकापर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांचे कौशल्य दिसून येते.

अनेक महिला करिअर घडवण्यासाठी कामाचे ठिकाण, वेळ आणि त्यांच्या सोयीनुसार करिअरचे क्षेत्र निवडताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कोर्सेसबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये महिला चांगले करिअर घडवू शकतात.

शिक्षण क्षेत्र

शिक्षकी पेशाची नोकरी करायला अनेक महिलांना आवडते. अनेक महिलांची या क्षेत्रात करिअर करण्याला पसंती असते. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे कामाची वेळ आणि योग्य पगार. त्यामुळे, अनेक महिला या क्षेत्रात करिअर करण्याला प्राधान्य देताना दिसतात. तुमच्या अनुभवांच्या आणि पदवीच्या जोरावर तुम्ही या क्षेत्रात चांगले करिअर करू शकता.

एअर होस्टेस

जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल आणि लोकांशी संवाद साधायला आवडत असेल तर एअर होस्टेसचा जॉब तुमच्या करिअरसाठी बेस्ट आहे. एअर होस्टेस बनण्यासाठी तुम्ही १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बारावीनंतर तुम्ही डिप्लोमा किंवा शॉर्ट टर्म कोर्स करून या क्षेत्रात तुमचे करिअर करू शकता. एअर होस्टेस बनण्यासाठी तुमचे वय १९ ते २५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. महिलांसाठी हा एक बेस्ट करिअर ऑप्शन आहे.

फॅशन डिझायनिंग

जर तुम्हाला फॅशन इंडस्ट्रीची आवड असेल आणि फॅशनचा चांगला सेन्स असेल तर तुम्ही फॅशन डिझायनिंगमध्ये उत्तम प्रकारे करिअर करू शकता. फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री करू शकता. यासाठी तुम्ही १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

त्यानंतर, तुम्ही फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्रीचे शिक्षण घेऊ शकता. यासाठी पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी ४ वर्षांचा आणि पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी ३ वर्षांचा आहे. फॅशन डिझायनिंगमध्ये महिलांना कामाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cold Wave Warning Maharashtra : विदर्भात थंडीचा येलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज समोर, सतर्कतेचा इशारा

iPhone 15 झाला एकदम स्वस्त! 'या' ठिकाणी मिळतोय 28 हजारपेक्षा जास्त डिस्काउंट

Latest Marathi News Update :‘वंदे मातरम्’ वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन

Mumbai News: मुंबईच्या जलव्यवस्थापनाला बळ! सांडपाणी वाहतुकीसाठी नव्या ‘वॉटर टनेल'ला CRZ मंजुरी; कुठून कुठे असणार मार्ग?

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा अपघाती मृत्यू, नागपूरहून गडचिरोलीला जाताना दुर्घटना

SCROLL FOR NEXT