Career Tips esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : वर्क फ्रॉम होम करायचे आहे? मग, ‘हे’ करिअर ऑप्शन आहेत बेस्ट

कोरोना महामारीच्या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा दिली. त्यामुळे, या वर्क फ्रॉम होम मॉडेलची सगळीकडे चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झाली.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : कोरोना महामारीच्या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा दिली. त्यामुळे, या वर्क फ्रॉम होम मॉडेलची सगळीकडे चर्चा देखील झाली. त्यानंतर, कोरोनाचे हळूहळू प्रमाण कमी झाले आणि काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी हायब्रीड मॉडेल लागू केले.

मात्र, काहींची आज ही वर्क फ्रॉम होमला पसंती आहे. खास करून महिलांची या वर्क फ्रॉम होम सारख्या जॉब्सला पसंती आहे. जर तुम्हाला ही घरून काम करायचे असेल आणि चांगला पगार ही हवा असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा करिअर ऑप्शनबद्दल सांगणार आहोत, जे वर्क फ्रॉम होमसाठी बेस्ट आहेत, आणि ज्यातून तुमची चांगली कमाई देखील होऊ शकते.

सोशल मीडिया मॅनेजर

सोशल मीडिया मॅनेजर हा कोणतीही कंपनी, ब्रॅंड किंवा कोणत्याही प्रमुख संस्थेमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचे काम करतो. जर तुम्हाला सोशल मीडियावर कनेक्ट राहायला आवडत असेल, तर हा करिअर ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे.

कंपनीची अधिक प्रगती होण्यासाठी सोशल मीडिया मॅनेजर अनेक नवे फंडे आणि नवीन पद्धतीचा अवलंब करतात. जेणेकरून कंपनीची, संस्थेची किंवा त्या ब्रॅंडची चांगली प्रतिमा कायम ठेवता येईल. या क्षेत्रात वर्क फ्रॉम होमच्या देखील अनेक संधी आहेत.

अनुवादक (ट्रान्सलेटर)

ट्रान्सलेटरच्या क्षेत्रात देखील करिअरच्या अनेक संधी आहेत. मात्र, तुम्हाला एका भाषेसोबत इतर अनेक भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्हाला इतर भाषांचे ज्ञान असल्यास, तुम्ही घरबसल्या अनुवादक म्हणून काम करू शकता.

जर तुम्हाला इंग्रजी आणि हिंदी भाषांसोबत एखादी परदेशी भाषा येत असेल तर तुम्ही हिंदी ते इंग्रजी किंवा इंग्रजी ते हिंदी भाषांतराचे काम करून पैसे कमवू शकता. यासोबतच परदेशी भाषेचा मराठीत किंवा हिंदीत अनुवाद करून ही तुम्ही पैसे कमावू शकता.

ऑनलाईन शिक्षक

सध्याचे युग हे डिजिटल आहे. आजकाल प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन माध्यमातून मिळत आहे. त्यामुळे, बरेच लोक हे ऑनलाईन शिक्षणाद्वारे पैसे कमावण्याचे मार्ग शोधत आहेत. ऑनलाईन शिक्षक होऊन तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

वर्क फ्रॉम होम करण्यासाठी हा जॉब बेस्ट आहे. विज्ञान, गणित या विषयांसोबत तुम्ही JEE Mains, Neet इत्यादींशी संबंधित विषय तुम्ही शिकवू शकता. मात्र, तुमच्याकडे या विषयांशी निगडीत पदवी असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर कायम, 'या' जिल्ह्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Paithan Accident: पेट्रोल भरण्यासाठी कार वळवली, पण क्षणात काळाचा घाला; पाचोडजवळ कंटेनरच्या धडकेत दोघे ठार, एक जण गंभीर

करकायदा : रिट्स, इन्व्हिट्सवरील लाभांश करमुक्त

स्मार्ट माहिती : आयटी व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार यांच्यात दरी

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पत्राने कोंडी फुटली; झारखंडमध्ये सरकार-विद्यार्थी आंदोलकांमध्ये आज निर्णायक चर्चा

SCROLL FOR NEXT