Career Tips esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : वारंवार सर्च करूनही जॉब मिळत नाही? मग,'या' स्ट्रॅटेजीचा करा वापर

वारंवार सर्च करूनही जर मनासारखा जॉब मिळत नसेल तर निराश होऊ नका.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : सध्याच्या काळात जॉब मिळवणे हे काही सोपे काम राहिलेले नाही. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉबसाठी अप्लाय केल्यानंतर ही कित्येकांना मनासारखा जॉब मिळत नाही. यासाठी वारंवार जॉब सर्चिंग केले जाते. मात्र, तरी देखील अनेकांच्या पदरी निराशा येते.

अशा परिस्थितीमध्ये मग अनेकांच्या मनात नकारात्मक विचार येतात. मग, स्वत:मधील कमतरता काढल्या जातात आणि मी त्या जॉबच्या लायकच नाही, इथपर्यंतचे गंभीर आणि निगेटिव्ह विचार केले जातात. हे अत्यंत चुकीचे आहे.

जर वारंवार सर्च करूनही तुम्हाला जर मनासारखा जॉब मिळत नसेल तर निराश होऊ नका. त्याऐवजी तुमचा दृष्टिकोन बदला आणि जॉब मिळवण्यासाठी तुमची रणनिती ज्याला की आपण स्ट्रॅटेजी म्हणतो ती बदला. वेगळी रणनिती अवलंबून बघा आणि मग बघा तुम्हाला याचा नक्कीच सकारात्मक परिणाम पहायला मिळेल.

आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही स्ट्रॅटेजीबद्दल सांगणार आहोत. ज्यांचा अवलंब केल्यावर तुम्हाला जॉब मिळणे सोपे होऊन जाईल.

ऑनलाईन जॉब प्लॅटफॉर्मचा करा वापर

अनेकदा कित्येक प्रयत्न करूनही चांगला जॉब मिळत नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे नोकरी शोधण्याची तुमची पद्धत चुकीची देखील असू शकते. या परिस्थितीमध्ये आता तुम्ही तुमची नोकरी शोधण्याची पद्धत बदलणे गरजेचे आहे.

ऑफलाईन नोकरी शोधण्यासोबतच तुम्ही ऑनलाईन नोकरी प्लॅटफॉर्मवर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करा. यामुळे, तुमची नोकरीची संधी अनेक पटींनी वाढेल. यासाठी तुम्ही ऑनलाईन जॉब पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये जॉब अलर्ट सेट करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला नोकरी संदर्भातल्या महत्वाच्या नोटिफिकेशन्स मिळतील.

Resume अपडेट करा

वारंवार सर्च करूनही चांगला जॉब मिळत नसेल तर यामागे तुमचा Resume अपडेट नसणे हे देखील मुख्य कारण असू शकते. अनेक जण Resume अपडेट न करता तोच Resume अनेक कंपन्यांमध्ये पाठवतात.

प्रत्येक कंपनी आणि त्या नोकरीशी संबंधित वेगवेगळ्या आवश्यकता असू शकतात. त्यामुळे, कोणत्याही कंपनीत जॉबसाठी अप्लाय करण्यापूर्वी तुमचा Resume अपडेट करणे महत्वाचे आहे.

स्किल्सवर काम करा

आपण सर्वांनी आपल्या क्षेत्राशी निगडीत असलेली शैक्षणिक पात्रता प्राप्त करतो. त्यासाठी मन लावून अभ्यास करतो आणि पदवी मिळवतो. मात्र, अनेकदा आपण आपल्या स्किल्स ज्याला कौशल्ये ही म्हटले जाते. त्यावर काम करायला विसरतो.

त्यामुळे, नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्किल्सवर काम करणे महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या क्षेत्राशी निगडीत असलेले ऑनलाईन कोर्स देखील करू शकता आणि विविध प्रकारचे वर्कशॉप्स करू शकता.

यामुळे, तुमचा Resume देखील अपडेट होईल आणि या स्किल्स त्यामध्ये अ‍ॅड होतील आणि नोकरी मिळणे सोपे होऊन जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

SCROLL FOR NEXT