Career Tips esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : ग्राफिक डिझायनिंगचे क्षेत्र खुणावतेय? मग, तुम्ही करायलाच हवेत 'हे' टॉप कोर्स

बदललेले तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हीटीमुळे या क्षेत्रात अनेक छोटे-मोठे कोर्स निर्माण झाले आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : मागील काही वर्षांमध्ये ग्राफिक डिझायनिंगच्या क्षेत्रात खूप काही बदल झाले आहेत. बदललेले तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हीटीमुळे या क्षेत्रात अनेक छोटे-मोठे कोर्सेस निर्माण झाले आहेत. अनेक कंपन्या आता अनेक छोट्या-मोठ्या क्रिएटिव्हीटीसाठी ग्राफिक डिझायनर्सची नियुक्ती करतात. त्यामुळे, या क्षेत्रामध्ये भरपूर संधी निर्माण झाली आहे.

ग्राफिक डिझायनर्स त्यांच्या कौशल्याचा वापर करून त्यांच्या नवीन दृष्टीकोनातून जाहिराती, बॅनर, विविध प्रकारचे पोस्टर्स तयार करतात. यासोबततच वेबसाईट, मीडिया, जाहिराती, पुस्तके, लोगो, पोस्टर्स इत्यादी आकर्षक बनवण्यासाठी ग्राफिक डिझायनर्स विविध प्रकारच्या सॉफ्टवेअर्सचा वापर करतात.

या क्षेत्रामध्ये पदवी, डिप्लोमा आणि आता तर ऑनलाईन अभ्याक्रम देखील उपलब्ध आहेत. मात्र, या क्षेत्रातील टॉप कोर्स कोणते आहेत? जे ट्रेडिंग आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

मोशन ग्राफिक डिझायनर

मोशन ग्राफिक डिझायनर व्हिडिओ आणि चित्रपटांसाठी अ‍ॅनिमेटेड ग्राफिक्स तयार करण्याचे काम करतात. यासोबतच ते व्हिज्युएल इफेक्ट्स देखील क्रिएट करतात. त्यांच्या या कौशल्याचा सर्वाधिक वापर हा चित्रपट आणि अ‍ॅनिमेटेड मूव्हिज, डॉक्युमेंटरी आणि जाहिरातींसाठी केला जातो.

यासाठी विविध प्रकारच्या सॉफ्टवेअर टूल्सची मदत घेतली जाते. भारतात या पदाचा सरासरी पगार वर्षाला 4.5 लाख रूपये आहे.

वेब डिझायनर

वेब डिझायनरचे काम हे वेबसाईट डिझाईन करण्याचे असते. हा कोर्स करताना विविध प्रकारचे स्किल्स शिकवले जातात. ज्यामध्ये, टेंम्प्लेट डिझायनिंग, लोगो डिझायनिंग, थ्रिडी आणि टूडी अ‍ॅनिमेशनसह, फ्लॅशिंग, बॅनर डिझायनिंग आणि ग्राफिक डिझायनिंगसह वेबसाईट मेंटेनंन्स इत्यादी स्किल्स शिकवल्या जातात. भारतातील एंट्री लेव्हल वेब डिझायनरचा सरासरी पगार हा वर्षाला ३.५ लाख रूपये आहे.

क्रिएटिव्ह डायरेक्टर

डिझाईन टीमचा प्रमुख म्हणून क्रिएटिव्ह डायरेक्टर काम करतो. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला फार मोठी जबाबदारी सांभाळावी लागते. एखाद्या प्रोजेक्टचे, चित्रपटाचे किंवा जाहिरातीच्या क्रिएटिव्ह प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि दिग्दर्शन करण्याची प्रमुख जबाबदारी क्रिएटिव्ह डायरेक्टरची असते.

या कोर्समध्ये तुम्हाला डिझायनिंगचे विविध सॉफ्टवेअर्स आणि विविध प्रकारचे टूल्स शिकवले जातात. हा कोर्स सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. या कोर्सला भरपूर डिमांड आहे. भारतातील क्रिएटिव्ह डायरेक्टरच्या पगाराचे पॅकेज हे वर्षाला सुमारे २५ लाख रूपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघर साधू हत्याकांडाचे आधी आरोप केले, आता पक्षात का घेतलं? CM फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, भाजपकडून प्रवेशाला स्थगिती

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

CM Devendra Fadnavis: मित्रपक्षांना शत्रू समजू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, युती म्हणून एकत्र लढणार

Kolhapur News: कुरुंदवाडच्या रणांगणात कलाटणी! ठाकरे गट शाहू आघाडीसोबत; काँग्रेस ‘एकाकी’

Video Viral: वाहत्या पुरात हरीणाला हत्तीनं दिलं जीवनदान, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT