Career Tips esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : सोशल मीडिया स्टार व्हायचय? मग, तुमच्याकडे 'ही' कौशल्ये असणे आवश्यक

सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. या सोशल मीडियाचा वापर करून अनेक जण स्वत:ची एक आगळीवेगळी ओळख निर्माण करत आहेत. सध्या अनेक जण सोशल मीडियावरून आपले टॅलेंट सादर करून बक्कळ पैसे देखील कमवताना दिसत आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. या सोशल मीडियाचा वापर करून अनेक जण स्वत:ची एक आगळीवेगळी ओळख निर्माण करत आहेत. सध्या अनेक जण सोशल मीडियावरून आपले टॅलेंट सादर करून बक्कळ पैसे देखील कमवताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे हे इन्फ्लुएन्सर सेलिब्रिटींपेक्षा काही कमी नाहीत. लोक त्यांना फॉलो करतात त्यांचे म्हणणे ऐकतात आणि इतकच नव्हे तर त्यांनी काही सांगितलेल्या गोष्टींचे अनुकरण देखील करतात.

याच कारणांमुळे अनेक मोठ्या कंपन्या त्यांच्या प्रॉडक्ट्सचे प्रमोशन करण्यासाठी आणि अधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी या सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सरशी संपर्क साधतात. एकदा या सोशल मीडियावरील स्टार्सने प्रभावशाली म्हणून त्यांची छाप सोडली की, त्यांच्यासाठी यशाचे मार्ग खुले होतात.

जर तुम्हाला ही सोशल मीडियावरील स्टार व्हायचे असेल आणि या क्षेत्रात यशस्वी करिअर करायचे असेल तर तुम्हाला काही कौशल्ये अवगत असणे महत्वाचे आहे. कोणती आहेत ही कौशल्ये? चला तर मग जाणून घेऊयात.

प्रभावी संभाषण कौशल्य

जर तुम्हाला सोशल मीडियावर स्टार व्हायच असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या संभाषण कौशल्यांवर काम करणे आवश्यक आहे. संभाषण कौशल्यावर काम करण्यासोबतच तुम्हाला प्रेक्षकांच्या कमेंट्स, मेसेजेस आणि प्रतिसाद यांना ही सकारात्मक प्रतिसाद द्यावा लागेल. हे खूप महत्वाचे आहे. कारण, जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता तेव्हा त्यांच्याशी कनेक्ट होण्यात मदत होते. ज्यामुळे, तुमचा प्रेक्षकवर्ग किंवा फॉलोअर्स वाढण्यात मदत होते.

कंटेंटचे ज्ञान आवश्यक

जर तुम्हाला उत्कृष्ट सोशल मीडिया स्टार व्हायच असेल तर तुमचा कंटेंट हा तगडा असणे फार महत्वाचे आहे. जर तुमच्या कंटेंटमध्ये दम नसेल तर तुमच्या व्हिडिओला जास्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता ही कमी आहे.

यासोबतच तुम्ही फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि ग्राफिक डिझायनिंगच्या मदतीने तुमचा कंटेंट अधिक चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडू शकता. यामुळे, लोक तुमच्या कंटेंटकडे आकर्षित होतील आणि तुम्हाला फॉलो करायला सुरूवात करतील. त्यामुळे, तुमचा कंटेट उत्तम असावा आणि तो प्रभावीपणे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न तुम्ही करावा.

प्लॅटफॉर्मबद्दल माहिती असणे आवश्यक

जर तुम्हाला सोशल मीडिया स्टार व्हायचे असेल तर, सर्वात आधी तुम्हाला सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्म्सबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा कंटेट पोहचवायचा असेल तर त्यासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करायचा? याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हे ज्ञान जर तुम्हाला असेल तर तुम्ही अधिक प्रभावीपणे काम करू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदीचे भाव घसरले! चांदी तब्बल ₹8,000 ने स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

Shoaib Akhtar : पाकिस्तानमधील क्रिकेट नामशेष होण्याच्या मार्गावर! भारताविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

Australia vs Sri Lanka: झिम्बाब्वेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाची कसोटी, आज श्रीलंकेशी निर्णायक लढत

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

Mumbai : अल्पवयीनाने कारनं उडवलं, १० दिवसांनी पतीचा मृत्यू; पत्नीची प्रकृतीही चिंताजनक

SCROLL FOR NEXT