Career Tips  esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : ऑफिसमधील कामाचे प्रेशर कमी करण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्सची घ्या मदत

ऑफिसमधील कामाचे प्रेशर हे व्यवस्थितरित्या हॅंडल करता येणे गरजेचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : अनेक जण ऑफिसमधील कामाच्या प्रेशरमुळे वैतागून जातात. त्यांना या कामाचे इतके टेंन्शन येते की, काही जण जॉब सोडून जाण्याचा विचार देखील करतात. मात्र, असे करू नका.

तुम्हाला ऑफिसमध्ये कामाच्या संदर्भातील कोणती ही समस्या असेल किंवा तुमच्यावर कामाचे प्रेशर येत असेल तर त्या विषयाच्या मूळाशी जाण्याचा प्रयत्न करा. त्यावर सोल्यूशन काढण्याचा प्रयत्न करा.

तुम्ही त्या अडचणींवर मात करायला शिकले पाहिजे, त्यांना घाबरून तुम्ही जॉब सोडता कामा नये. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कामाचे प्रेशर कसे कमी केले जाईल, याचा विचार केला पाहिजे आणि करिअरमध्ये पुढे जायला हवे. आज आम्ही तुम्हाला खास या संदर्भातल्या टिप्स सांगणार आहोत.

बॉससोबत चर्चा करा

जर तुम्हाला ऑफिसमध्ये कामाचे जास्त प्रेशर येत असेल तर यासंदर्भात तुम्ही तुमच्या बॉससोबत चर्चा करणे महत्वाचे आहे. या चर्चेतून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. कामाच्या प्रेशरमुळे तुम्हाला कोणत्या अडचणी येतात? आणि याचा तुमच्या कामावर आणि मानसिक स्थितीवर काय परिणाम होतो? या संदर्भात तुम्ही बॉससोबत चर्चा करणे गरजेचे आहे.

कामाची लिस्ट तयार करा

ऑफिसमधील कामाचे प्रेशर कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या कामांची एक लिस्ट तयार करा. त्यामुळे, तुमचे काम सोपे होऊन जाईल. कोणते काम कोणत्या वेळात संपवायचे? आणि त्याला किती वेळ द्यायचा याचे नियोजन करा. त्यामुळे, तुमचे काम ही सोपे होईल आणि तुमच्यावर कामाचा ताण ही येणार नाही.

शॉर्टकटचा वापर करू नका

अनेक जण काम लवकरात लवकर संपावे यासाठी शॉर्टकटचा वापर करतात. मात्र, असे केल्याने तुमचे काम बिघडण्याची शक्यता असते किंवा काम करताना काही चूका होतात. त्यामुळे, काम करताना कधीच शॉर्टकटचा वापर करू नका.

तुमचे काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा आणि वेळेत संपवण्याचा प्रयत्न करा. यामुळे, तुम्हाला कामाचे प्रेशर ही जाणवणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT