sakal
एज्युकेशन जॉब्स

द्रुतगती मार्गावर अपघात प्रवण ठिकाणांची पहाणी

एमपीएससीने राज्य सेवेच्या मुख्य परीक्षेची २७ डिसेंबरला उत्तर तालिका प्रसिद्ध केली आहे. त्यात गौताळा हे अभयारण्य असल्याचे एमपीएससीने मान्य केले आहे.

CD

एमपीएससीने राज्य सेवेच्या मुख्य परीक्षेची २७ डिसेंबरला उत्तर तालिका प्रसिद्ध केली आहे. त्यात गौताळा हे अभयारण्य असल्याचे एमपीएससीने मान्य केले आहे.

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) (MPSC) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०, ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आली. यातील प्रश्नपत्रिकेत'' प्रश्न क्रमांक २७ मध्ये ‘गौताळा औट्रमघाट हे 'राष्ट्रीय उद्यान' असे नमूद केले होते. ते चूक असल्याने विद्यार्थ्यांनी (Student) आक्षेप घेत ते अभयारण्य असल्याचे एमपीएससीला कळविले होते. मात्र, त्यात दुरुस्ती करण्याऐवजी प्रश्नच रद्द (Question Cancel) केला. यामुळे अनेक उमेदवारांना ०.५२ गुणांनी अनुत्तीर्ण व्हावे लागले होते.

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन-१ या पेपरमधील प्रश्न क्रमांक ७० मध्ये गौताळा औट्रमघाट हे अभयारण्य असल्याचा प्रश्न विचारण्यात आला असून उत्तरतालीकेत हा प्रश्न बरोबर असल्याचे मान्य केले आहे. यामुळे 'एमपीएससी'तील सावळा गोंधळ उघड आला आहे, असे सूरज पवार या विद्यार्थ्याने सांगितले.

एमपीएससीने राज्य सेवेच्या मुख्य परीक्षेची २७ डिसेंबरला उत्तर तालिका प्रसिद्ध केली आहे. त्यात गौताळा हे अभयारण्य असल्याचे एमपीएससीने मान्य केले आहे. मात्र, संयुक्त पूर्व परीक्षेच्या वेळी उद्यानाऐवजी अभयारण्य असल्याचे मान्य करणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता थेट प्रश्नच रद्द केला. याबाबत न्याय मिळावा म्हणून विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा याचा संदर्भ हा ‘गौताळा अभयारण्य'' असाच आढळून येत आहे. शासन दफ्तरी जर गौताळा हे अभयारण्य अशी नोंद आहे.

दरम्यान, तसेच विद्यार्थ्यांनी ज्या प्रश्नांवर आक्षेप घेतले आहेत, त्यावर एमपीएससीने पुनर्विलोकन करावे व सुधारित चौथी उत्तरतालिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

प्रश्नपत्रिकेत गौताळा 'राष्ट्रीय उद्यान' कसे बरोबर मानले जात आहे ? हा मोठा प्रश्न आहे. या व्यतिरिक्त एमपीएससी कोणते संदर्भ ग्रंथ प्रमाण मानत आहे, हे जाहीर करावे. एमपीएससीच्या या आडमुठे धोरणामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एका परीक्षेत प्रश्न चुकीचा तर दुसऱ्या परीक्षेत तोच प्रश्न विचाराला जातो आणि बरोबर असल्याचेही मान्य केले जोते. यामुळे विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक न्यायाचा भंग होत आहे.

- सोमनाथ चव्हाण, विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT