10th-12th Exam
10th-12th Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

10th-12th Exam : परीक्षेचा स्ट्रेस, टेन्शन, भीती कशाला?

सकाळ डिजिटल टीम

परीक्षेचा निकाल हवा तसा नाही लागला तरी स्वतःमध्ये बदल घडवून वेगळे पर्याय निवडून आयुष्यात यशस्वी होता येते हेच खरे नाही का?

-श्रुतिका कोतकुंडे

नवीन शिक्षणप्रणालीत दहावी-बारावीचे (10th-12th Exam) महत्त्‍व जरी कमी झाले असले तरी यापुढेही परीक्षांना महत्त्‍व राहणारच आहे. परीक्षेमध्ये यशासाठी अभ्यासाची गोडी, योग्य अभ्यास कौशल्ये, वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासाची नियमितता तसेच ताणाचे व्यवस्थापन गरजेचे असते. परीक्षेचा बागुलबुवा नको आणि ताणही का नको, याबाबत पालकांशी संवाद साधणारा लेख.

फेब्रुवारी- मार्च महिना उजाडला की, परीक्षांचे वारे वाहायला लागतात. माझ्याकडे किमान १-२ शाळकरी किंवा कुमारवयीन मुलं परीक्षेचा स्ट्रेस, टेन्शन, भीतीची लक्षणे घेऊन येतातच. खरंतर, परीक्षा ही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या (Students) आयुष्यातली अपरिहार्य अशी गोष्ट आहे. आजच्या शिक्षण व्यवस्थेत मुलांची गुणवत्ता तपासण्यासाठी सध्यातरी तेच एकमेव मोजमाप आहे. मुलं कितीही हुशार असली तरी परीक्षेत यशस्वी झाल्याशिवाय ते सिद्ध होत नाही व शैक्षणिक प्रवासात पुढची पायरी गाठता येत नाही.

गेल्याच आठवड्यात भेटीसाठी आलेली परीक्षार्थी मुग्धाची आई (Mother) मला सांगत होती, मुग्धा बारावीची तयारी करतेय. सध्या कुटुंबात कोणाशीच ती बोलत नाही. सारखी रडत बसते. जेवत नाही. नीटची तयारी करणाऱ्या कौशलचे बाबा सांगत होते की, एरवी कौशल अत्यंत हुशार फोकस विद्यार्थी आहे; परंतु हल्ली तो पटकन चिडतो. अभ्यासाला बसला की, त्याला काहीच लक्षात राहत नाही. त्याला सतत नापास होण्याची धास्ती वाटते. हुशार मेहनती मुलांच्या बाबतीतही हे का घडत असेल?

हल्ली पालकांना आपले मूल मागे पडू नये म्हणून शाळेत टाकण्याची घाई झालेली दिसते. २-३ वर्षांचे मूल झाले की, त्याला नर्सरीमध्ये ढकलले जाते. मग, लवकरच परीक्षानामक भूत पालकांच्या मानगुटीवर येऊन बसते. खेळणे-बागडणे सोडून वह्या पूर्ण करण्याचा नादात अभ्यास आणि परीक्षानामक राक्षसाची भीती मुलांच्या मनात घर करू लागते. कंटाळवाण्या अभ्यासाच्‍या प्रचंड रेट्यामध्ये मुलांना अभ्यास स्वतःसाठी करायचा असतो, समजून करायचा असतो हेच कधी जाणवून दिले जात नाही. जिथे खेळ, कला मजेचे आणि प्रेमाचे वातावरण असते तिथे खेळीमेळीने अभ्यासाशी पण गट्टी जमते आणि मुलांची स्वतःची अशी अभ्यासाची शैली घडत जाते. मनापासून अभ्यास केला की, परीक्षाही सोपी वाटू लागते. सतत मार्कांची चढाओढ नसते.

तिथे मूल स्वेच्छेने स्वतःसाठी संकल्पना समजून उत्तमोत्तम अभ्यास करू लागतो. यालाच अभ्यासात सूर गवसणे, असे म्हणूया. याच्या पुढचा अभ्यासाचा प्रवास जर पालकांनी मोकळीक दिली तर मुलांमध्ये आत्मभान जागवणारा आणि आत्मविश्वास देणारा ठरू शकतो. परीक्षातंत्र आणि मंत्र आत्मसात करत मूल कुठल्याही परीक्षेला ग्रोथ माईंडसेटने भिडायला शिकते. संकल्पना समजून अभ्यास करणे, कठीण विषयांना पुरेसा वेळ देणे व परीक्षेचे टेक्निक लक्षात घेतले तर कुठल्याही परीक्षेचे अवडंबर होणार नाही.

वाढता अभ्‍यासक्रम शिकवण्याच्या नादात अभ्यास कसा करायचा, तो कसा लक्षात ठेवायचा आणि तो परीक्षेत कशा पद्धतीने उतरवायचा यावर शिक्षकांनी भर दिला पाहिजे. मार्कांसाठी चढाओढीपेक्षा स्वतःला घडविण्यासाठी अभ्यास करायचा असतो, हे पालकांनीही समजून घ्यायला हवे. स्पर्धा परीक्षेत एक रस्ता बंद झाला तरी दुसरा पर्याय शोधता येतो, हा विश्वास मुलांना देण्याची गरज आहे. पालकांनी आणि मुलांनी परीक्षेला जीवन-मरणाचा प्रश्न बनवू नये. परीक्षेचा निकाल हवा तसा नाही लागला तरी स्वतःमध्ये बदल घडवून वेगळे पर्याय निवडून आयुष्यात यशस्वी होता येते हेच खरे नाही का?

(लेखिका मनोविकारतज्‍ज्ञ व मानसोपचारतज्‍ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT