Interview Questions esakal
एज्युकेशन जॉब्स

Interview Questions : इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जाणाऱ्या कठिण प्रश्नांचे कसे अन् काय उत्तर द्यावे? वाचा

या टिप्स वाचून तुम्ही मल्टिनॅशनल कंपनीचे इंटरव्ह्यू सहज क्रॅक करू शकाल.

साक्षी राऊत

Interview Questions : डिग्री घेऊन विद्यार्थी नोकरीसाठी जेव्हा बाहेर पडतात तेव्हा पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये काय विचारतील, किती कठिण प्रश्न असतील असे अनेक प्रश्न मनात येतात. नुकतीच डिग्री घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज आम्ही खास माहिती घेऊन आलोय. कठिणातला कठिण प्रश्न विचारल्यानंतर त्याचे उत्तर कसे द्यावे यासंबंधित काही टिप्स आज आम्ही सांगणार आहोत. या टिप्स वाचून तुम्ही मल्टिनॅशनल कंपनीचे इंटरव्ह्यू सहज क्रॅक करू शकाल.

प्रश्न १ - तुम्हाला अपयश आलं तेव्हा ती परिस्थिती तुम्ही कशी टॅकल केली?

उत्तर - उदाहरणार्थ, "माझ्या आधीच्या जॉबमध्ये मी चुकीच्या टाइम मॅनेजमेंटमुळे प्रोजेक्टची कमिटेड डेट चुकवली. मात्र माझ्या या चुकीची मी जबाबदारीसुद्धा घेतली. प्रोजेक्टला परत ट्रॅकवर आणण्यासाठी मी परत एक प्लान डेव्हलप केला. आधीच्या प्लानिंगमध्ये काय चुका झाल्या ते शोधून मी पुढल्या वेळी त्यात सुधारणा केल्या. व्यवस्थित वेळेचे नियोजन करून नवा प्लान रेडी केला. त्यामुळे मी प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करू शकलो आणि त्यातून मला वेळेच्या नियोजनाचे आणि कामाच्या मूल्याचे महत्व कळले.

प्रश्न २ - तुमची सगळ्यात मोठी विकनेस?

उत्तर- मी सध्या ज्या क्षेत्रात काम करतेय तिथे माझ्या पब्लिक स्पिकिंग स्किलचा मला चांगला फायदा होतो. छोट्या समुहात मी सहज बोलू शकतो. मात्र मी असे नोटिस केले आहे की मोठ्या समुहात बोलताना मला अस्वस्थ वाटते. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मी अनेक स्पिकिंग वर्कशॉपमध्ये पार्टिसिपेट करते/करतो. शिवाय माझी ही भिती घालवण्यासाठी मी मोठ्या ग्रुप्समध्ये प्रेजेंटेशन देण्याची संधीही कधीच सोडत नाही.

प्रश्न ३ - इंटरव्ह्यूसाठी आलेल्या इतर लोकांमध्ये ही जॉब तुम्हालाच मिळावी असे तुम्हाला का वाटते?

हा प्रश्न उमेदवारांना विचारला जातो जेणेकरून ते त्यांचे कौशल्य सिद्ध करू शकतील आणि कंपनीने दिलेले चॅलेंजेस स्वीकारण्याची क्षमता उमेदवारात आहे की नाही हेसुद्धा यातून चेक केले जाते.

उत्तर 3 - उदाहरणार्थ, माझा विश्वास आहे की माझी कौशल्ये आणि अनुभव यांचे संयोजन मला या भूमिकेसाठी योग्य बनवते. माझ्याकडे केवळ पदासाठी आवश्यक असलेलं टेक्नीकल नॉलेजच नाही तर स्ट्राँग अजेंडा आणि डिटेलिंग काम देण्याचेसुद्धा कौशल्य आहे. माझ्या याच कौशल्यांसाठी मागील कंपनीतसुद्धा मी हायलायटेड होतो. मी या कंपनीमध्ये माझा अनुभव आणून कंपनीच्या वाढीसाठी मदत करण्यास उत्सुक आहे. (Job)

प्रश्न ४ - तुमच्यावर एखादा कठीण प्रसंग आला तेव्हा तुम्ही त्यावर कसे काम केले?

उत्तर ४ - माझ्या आधीच्या कंपनीत मला लिमिटेड सोर्ससह एका प्रोजेक्ट मॅनेजमेंटची जबाबदारी सोपवण्याता आली होती. यात मला अनेक अडचणी आल्यात. टेक्नीकल इशू ते कंपनीचे कर्मचारी कंपनी सोडून जाणे यांसारख्या अडचणी येत होत्या. मात्र टीमसोबत मिळून आणि त्यांची वेळोवेळी साथ मिळवून त्यांच्या सहकार्याने काम केले. कर्चराऱ्यांना त्यांचा वेळे मॅनेज करण्याची सूट दिली जेणेकरून ते कामाला प्रायोरिटी देऊ शकतील. या सगळ्या एफर्ट्समुळे मी प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी झालो. (Lifestyle)

डिस्क्लेमर - वरील लेख विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत त्यांना नोकरीचा इंटरव्ह्यू देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोणातून तायर करण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

Datta Temple : मंदिरातून दत्त मूर्ती चोरीला, सायरन वाजला अन्; लोडेड पिस्तूल चोरट्यांनी..., थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT