UGC Approves PhD Research Ethics Course at SPPU admission open  Sakal
एज्युकेशन जॉब्स

PhD : नैतिकतेचा अभ्यासक्रम पीएच.डी.साठी अनिवार्य विद्यापीठात प्रवेश सुरू; आज शेवटची मुदत

‘संशोधनातील नैतिक मूल्य’ अर्थात ‘रिसर्च अँड पब्लिकेशन एथिक्स’ हा विषय दोन श्रेयांकांचा आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संशोधन क्षेत्रात स्वामित्व हक्कापासून ते विदाच्या (डेटा) गैरवापरापर्यंत विविध नैतिक वाद समोर येतात. त्यासाठी पीएच.डी.पासूनच संशोधनात नैतिक मूल्यांची शिकवणी देणारा अभ्यासक्रम विकसित केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे अनिवार्य केलेल्या या अभ्यासक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश सुरू झाले असून शुक्रवारपर्यंत (ता. १५) मुदत आहे.

‘संशोधनातील नैतिक मूल्य’ अर्थात ‘रिसर्च अँड पब्लिकेशन एथिक्स’ हा विषय दोन श्रेयांकांचा आहे. याला २१ मार्चपासून सुरुवात होणार असून एक महिना कालावधीचा असणार आहे. डिसेंबर २०१९ नंतर पीएच.डी. अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र असतील.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून ‘सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स’ला विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिली आहे. यासाठी पीएच.डी.धारक उमेदवारांना प्रवेश दिला जाणार असून कोर्ससाठी चार हजार रुपये प्रति विद्यार्थी शुल्क आकारले जाणार आहे.

अभ्यासक्रमात विज्ञान आणि नीतिशास्त्र, संशोधन या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एकूण सहा धड्यांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमासाठी १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. संपूर्ण अभ्यास ३० तासांचा आहे. विद्यापीठाच्या नियमांनुसार अभ्यासक्रमाच्या शेवटी ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT