UGC Gallery
एज्युकेशन जॉब्स

UGC ने जाहीर केली NET पात्र उमेदवारांसाठी भरती!

UGC ने जाहीर केली NET पात्र उमेदवारांसाठी भरती! 80 हजारांपर्यंत मिळेल वेतन

श्रीनिवास दुध्याल

नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे.

सोलापूर : नेट (NET) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीसह नेट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यूजीसी, नवी दिल्लीने शैक्षणिक सल्लागार पदासाठी अर्ज इच्छुकांकडून मागविले आहेत. ही भरती (Recruitment) कंत्राटी तत्त्वावर होईल. त्यामुळे या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असलेले सर्व उमेदवार शैक्षणिक सल्लागार (Educational Consultant) पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.ugc.ac.in/jobs ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्‍टोबर 2021 आहे.

यूजीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या नोकरीसाठी प्रोबेशन कालावधी किमान सहा महिने आहे. तसेच, कामगिरी पुनरावलोकनाच्या आधारावर ते वाढवता येते. त्याच वेळी, यूजीसीने कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी सेवा बंद करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. या पदासाठी निवड समितीच्या शिफारशीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट www.ugc.ac.in/jobs ला भेट द्या.

असे असेल वेतन

यूजीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 70000-80000 रुपये वेतन दिले जाईल.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या भरती व्यतिरिक्त, यूजीसीने अलीकडेच सहाय्यक प्राध्यापक भरतीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे. यानुसार 1 जुलै 2021 ते 1 जुलै 2023 पर्यंत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पीएचडी असणे आवश्‍यक नाही. गेल्या वर्षी झालेल्या कोव्हिड-19 संसर्गामुळे संशोधन कार्य थांबल्यामुळे आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT