NTA Issues UGC NET June 2024 Admit Cards: Download Instructions esakal
एज्युकेशन जॉब्स

UGC NET Admit Card 2024 : यूजीसी नेट जून 2024 परीक्षेचं ऍडमिट कार्ड मिळण्यास सुरुवात! कसं कराल डाऊनलोड,जाणून घ्या

UGC NET June 2024 : परीक्षा 18 जून 2024ला दोन सत्रांत पार पडणार

Saisimran Ghashi

NTA : महत्त्वाकांक्षी प्राध्यापक आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) पदवीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) द्वारे आयोजित करण्यात येणारी UGC NET जून 2024 परीक्षा प्रवेशपत्र आता डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले आहे.

परीक्षा 18 जून 2024 रोजी दोन सत्रांत - सकाळी 9.30 ते 12.30 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत पार पडणार आहे.

प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

  1. युजीसी नेटच्या अधिकृत संकेतस्थळ [https://ugcnet.nta.ac.in/] वर जा.

  2. मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या "UGC NET Admit Card 2024" लिंकवर क्लिक करा.

  3. तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मदिनांकसह लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा.

  4. सबमिट केल्यानंतर, तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.

  5. प्रवेशपत्र तपासा आणि पेज डाउनलोड करा.

  6. पुढील गरजेसाठी अॅडमिट कार्डची प्रत घ्या.

अडचण आल्यास काय करावे?

प्रवेशपत्र डाउनलोड करताना एखाद्या विद्यार्थ्याला अडचण आली किंवा प्रवेशपत्रात दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळली तर, युजीसी नेट जून 2024 परीक्षेसाठीचे विद्यार्थी हेल्पलाइन नंबर 011- 40759000 वर संपर्क करू शकतात किंवा ugcnet@nta.ac.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात.

युजीवीसी नेट परीक्षा म्हणजे काय?

ही परीक्षा भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये 'सहाय्यक प्राध्यापक' तसेच 'ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक' पदांसाठी भारतीय नागरिकांची पात्रता ठरविण्यासाठी घेतली जाते. परीक्षेची अधिक माहितीसाठी युजीसी नेटच्या अधिकृत संकेतस्थळाची [ugcnet.nta.ac.in] भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT