UGC Sakal
एज्युकेशन जॉब्स

UGC New Norms : चार वर्षांच्या पदवीनंतर आता थेट Ph.D, जाणून घ्या UGC चे नवे नियम

आता विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी मास्टर्स करण्याची गरज भासणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

Ph.D. After 4 Year Graduation : पीएचडी करू इच्छिणाऱ्या परंतु पदव्युत्तर पदवी पूर्ण न केल्यामुळे पीएचडी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी यूजीसीने बुधवारी मोठा दिलासा दिला आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

चार वर्षांच्या बॅचलर अभ्यासक्रमाला असलेले विद्यार्थी आता थेट पीएचडी करू शकणार आहेत. या विद्यार्थांना यासाठी वेगळी पदव्युत्तर पदवी करण्याची गरज भासणार नाही. असेही आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी स्पष्ट केले.

यूजीसी बऱ्याच काळापासून पदवीपूर्व कार्यक्रम पूर्ण करण्याचे मानक आणि पद्धत बदलण्याची तयारी करत होते. त्यासाठी नवा अभ्यासक्रम राबविण्याचा त्यांचा विचार होता. अखेर यामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. अलीकडेच, UGC ने चार वर्षांचा कार्यक्रम म्हणून ऑनर्स पदवी अभ्यासक्रम परिभाषित करून, पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी नवीन क्रेडिट आणि अभ्यासक्रम फ्रेमवर्क जाहीर केले होते.

तीन वर्षांचे पदवी अभ्यासक्रम बंद होणार नाही

दरम्यान, यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम जगदीश कुमार म्हणाले की, विद्यापीठे तीन ते चार वर्षांच्या कार्यक्रमांची निवड करू शकतात. यासाठी काय शिकवायचे किंवा कोणते अभ्यासक्रम चालवायचे आहेत याचा सर्वस्वी निर्णय विद्यापीठांवर सोडण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि गरजा लक्षात घेऊन विद्यापीठे स्वत: याबाबत निर्णय घेऊ शकतात. मात्र, चार वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम पूर्णपणे लागू होईपर्यंत तीन वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम बंद केला जाणार नसल्याचे जगदीश कुमार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोणाला मंत्रिपद मिळणार? भाजप खासदारांच्या दिल्लीतील हालचालींनी वाढवला सस्पेंस, अनेक नेते दिल्लीत तळ ठोकून

Pune Noise Pollution: निर्बंध कागदावरच! पुण्यात दहीहंडीत डीजेचा दणदणाट, आवाज ९० डेसिबलपर्यंत

Drip and Sprinkler Irrigation: कमी पाण्यात भरघोस पीक अन् ९०% पर्यंत सरकारी अनुदान; शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचनाचे मोठे फायदे!

आजचे राशिभविष्य - ०६ सप्टेंबर २०२६

Pune News : पुणे शहरात बंदी असूनही लेझर लाईटचा धुमाकूळ

SCROLL FOR NEXT