ramesh pokhriyal 
एज्युकेशन जॉब्स

OTPRMS प्रमाणपत्रे आता 'डिजीलॉकर'द्वारे मोफत उपलब्ध; शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : Online Teacher Pupil Registration Management System (OTPRMS)  मधील प्रमाणपत्रे कसल्याही अडचणी आणि त्रासाशिवाय मिळवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री श्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. मंत्रालयाने ही सगळी प्रमाणपत्रे 'डिजीलॉकर' (DigiLocker) ला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ही प्रमाणपत्रे National Council for Teacher Education (NCTE) च्या वेबसाईटवरुनही ऍक्सेस करता येऊ शकणार आहेत. ही प्रमाणपत्रे NCTE च्या वेबसाईटवरुन https://ncte.gov.in/website/DigiLocker.aspx या लिंकवर तर DigiLocker च्या https://digilocker.gov.in/ या लिंकवर उपलब्ध होतील.

तसेच मंत्रालयाने अशीही माहिती दिली आहे की, NCTE च्या माध्यमातून मिळवण्यात येऊ शकणाऱ्या या OTPRMS प्रमाणपत्रांसाठीची नोंदणी फी 200 रुपये होती. मात्र आता ती माफ करण्यात आली आहे. यामुळे आता संपूर्ण भारतातील लोकांना ही प्रमाणपत्रे कसल्याही त्रासाशिवाय सहजतेने डिजीटल पद्धतीने उपलब्ध होऊ शकणार आहेत.

याबाबत माहिती देताना केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट केलंय की, Online Teacher Pupil Registration Management System मधील प्रमाणपत्रे मोफत आणि सहजतेने उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने ही प्रमाणपत्रे DigiLocker शी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपण हे ऍप ऍपल आणि प्लेस्टोअरवरुन डाऊनलोड करु शकता.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT