UPPSC Staff Nurse Admit Card esakal
एज्युकेशन जॉब्स

स्टाफ नर्स भरती परीक्षेचे Admit Card जारी

सकाळ डिजिटल टीम

UPPSC Staff Nurse Admit Card 2021 : उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने स्टाफ नर्स भरती परीक्षेसाठी नुकतेच प्रवेशपत्र जारी केलेय. दरम्यान, ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले होते, त्यांनी अधिकृत वेबसाईटला uppsc.up.nic.in भेट देऊन प्रवेशपत्र (UPPSC Staff Nurse Admit Card 2021) डाउनलोड करू शकतात. या रिक्त पदाद्वारे राज्यात एकूण 3000 हून अधिक पदांची भरती केली जाईल.

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने स्टाफ नर्स भरती परीक्षेसाठी नुकतेच प्रवेशपत्र जारी केलेय.

यूपीपीएससीने जारी केलेल्या सूचनेनुसार, स्टाफच्या नर्स भरतीसाठी 3 ऑक्टोबर 2021 रोजी परीक्षा घेण्यात येईल. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 16 जुलै 2021 रोजी सुरू झालीय. याकरिता उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वेळ देण्यात आला होता, तर शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2021 होती. जारी केलेल्या सूचनेनुसार, एकूण 3012 रिक्त पदे असतील.

Admit Card कसे डाउनलोड करावे?

  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम UPPSC च्या अधिकृत वेबसाइटला uppsc.up.nic.in भेट द्या.

  • वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर दिलेल्या ACTIVITY DASHBOARD लिंकवर क्लिक करा.

  • आता A-4/E-1/2021, STAFF NURSE/SISTER GRADE-2 (MALE/FEMALE) EXAM-2021 या पर्यायावर जा.

  • तद्नंतर विनंती केलेला तपशील भरून सबमिट करा.

  • एकदा सबमिट केल्यानंतर, प्रवेशपत्र पुन्हा स्क्रीनवर दिसेल.

  • ते डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

परीक्षेचा तपशील

स्टाफ नर्स आणि सिस्टर ग्रेड - 2 भरती परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दोन तासांच्या एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल. जी सकाळी 11 वाजता सुरू होईल. तसेच, आयोगाने राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये परीक्षा आयोजित करण्याचे जाहीर केलेय. यात प्रयागराज, लखनौ, गाझियाबाद, मेरठ आणि गोरखपूर यांचा समावेश आहेत.

या पदांवर होणार भरती

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने स्टाफ नर्स पदासाठी जारी केलेल्या या रिक्त पदाद्वारे महिला उमेदवारांना अधिक जागा दिल्या आहेत. या रिक्त जागेत एकूण 3012 पदांची भरती केली जाईल. यात पुरुष उमेदवारांसाठी 341 जागा आणि महिला उमेदवारांसाठी 2671 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Heritage : दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन दोन स्मारके तोडली, मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळची घटना

पेशव्यांना होतं पैठणीचं आकर्षण! सोळा हात लांब, तीन किलो वजन; शुद्ध सोन्याच्या जरीची पेशवेकालीन पैठणी कशी होती?

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघावरून महायुतीत धुसफुस

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग! ७ नोव्हेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन

SCROLL FOR NEXT