UPSC
UPSC 
एज्युकेशन जॉब्स

UPSC IES 2020: अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

सकाळ डिजिटल टीम

UPSC IES Result 2020: पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२०चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार युपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर upsc.gov.in त्यांचे निकाल तपासू शकतात. ज्या उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांना आता मुलाखतीच्या फेरीसाठी हजेरी लावावी लागेल. यासाठी पात्र उमेदवारांना मुलाखतीची नेमकी तारीख आणि मुलाखतीचा तपशील एका पत्राद्वारे कळविण्यात येईल.

१८ ऑक्टोबरला झाली होती परीक्षा 
भारतीय अभियांत्रिकी सेवेची मुख्य परीक्षा १८ ऑक्टोबरला घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. मुख्य परीक्षा पात्र उमेदवारांनी पुढील सूचना मिळेपर्यंत युपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देत राहावी. मुलाखतीबाबत आयोगाने तारीख आणि वेळ जाहीर केल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. तसेच त्यात बदल करावा, अशी विनंती कोणत्याही उमेदवाराला करता येणार नाही, असंही आयोगाने स्पष्ट केलं आहे.    

निकाल असा पाहा
- सर्वप्रथम युपीएससीच्या upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
- मुख्य पानावर निकाल पाहण्यासाठी असलेल्या लिंकवर क्लिक करा. 
- क्लिक केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी स्क्रिनवर दिसून येईल. 
- या यादीत आपला रोल नंबर तपासा आणि प्रिंटआउट घ्या.

UPSCच्या अधिकृत वेबसाईटला जाण्यासाठी येथे ► क्लिक करा 

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Gautam Gambhir : केकेआरमध्ये थांबण्यासाठी शाहरूखने गंभीरसमोर ठेवला होता ब्लँक चेक

Swati Maliwal: "बलात्कार, जीवे मारण्याची...", स्वाती मालीवाल यांचा ध्रुव राठी अन् आपवरती मोठा आरोप

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

SCROLL FOR NEXT