UPSC 
एज्युकेशन जॉब्स

UPSC Mains 2020: मुख्य परीक्षा आणि अॅडमिट कार्डबाबत सर्व माहिती एका क्लिकवर!

सकाळ डिजिटल टीम

UPSC Mains 2020: नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)ची मुख्य परीक्षा 8 जानेवारीपासून सुरू होणार आहे. जे उमेदवार परीक्षेस बसणार आहेत आणि अद्याप प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) डाउनलोड केलेले नाही, त्यांनी ते अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन डाउनलोड करून घ्यावे.

4 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या केंद्रीय लोकसेवेच्या पूर्व परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेस बसण्याची संधी मिळते. पूर्व परीक्षेत उमेदवारांना मिळालेले गुण परीक्षेची संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयोगाद्वारे जाहीर केले जातात.

किती दिवस चालणार परीक्षा?
यूपीएससीची मुख्य परीक्षा ८, ९, १०, १६ आणि १७ जानेवारी या दिवशी घेण्यात येणार आहे. म्हणजे ही परीक्षा एकूण ५ दिवस चालणार आहे. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २ ते ५ अशी दोन सत्रात परीक्षा होणार आहे. कोरोना विषाणू महामारी सुरू असतानाच ही परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. 

असं डाऊनलोड करा अॅडमिट कार्ड
- सर्वात आधी उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. 
- त्यानंतर होमपेजवर Whats New (व्हॉट्स न्यू) या सेक्शनमध्ये E-Admit Card- Civil Services (Mains) Exam [ई-अॅडमिट कार्ड - सिव्हिल सर्व्हिसेस (मेन)] एक्झाम या लिंकवर क्लिक करा.
- नवीन विंडो उघडल्यानंतर Click Here वर पुन्हा एकदा क्लिक करा. 
- समोर दिसणाऱ्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि Yes वर क्लिक करा.
- तुम्हाला विचारली जाणारी माहिती भरा. त्यानंतर तुम्हाला अॅडमिट कार्ड दिसेल. 
- आता उमेदवार अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा.

नागरी सेवा परीक्षेची मुख्य परीक्षा ही लेखी स्वरुपातील परीक्षा आहे. जे उमेदवार या परीक्षेत पात्र ठरतील, त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. जो या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम टप्पा आहे. जितक्या पदांची भरती करावयाची आहे, त्याच्या दुप्पट संख्येत उमेदवार मुलाखतीसाठी बोलावले जातील. 

शेवटी ज्या उमेदवारांची निवड होईल, त्यांना अखिल भारतीय प्रशासकीय सेवेच्या विविध पदांवर नियुक्त करण्यात येईल. यामध्ये आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस आणि आरटीएस या सनदी सेवांचा समावेश आहे.

UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा 

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT