UPSC_NDA 
एज्युकेशन जॉब्स

UPSC NDA Result: यूपीएससी एनडीएचा निकाल जाहीर; येथे पाहा मेरिट लिस्ट

सकाळ डिजिटल टीम

UPSC NDA Result: पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी आणि नेव्हल अॅकॅडमी परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. ६ सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) तर्फे मुलाखती घेण्यात आल्या होत्या. 

लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्हीचे गुण मिळवून ५३३ जणांची अंतिम यादी तयार करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय (मेडिकल) चाचणीचे निकाल ग्राह्य धरलेले नाहीत. सध्या जाहीर करण्यात आलेल्या यशस्वी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतरच अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे. 

संपूर्ण गुणवत्ता यादी (UPSC NDA merit list) बातमीच्या शेवटी दिलेल्या लिंकवर जाऊन पाहू शकता. निकाल जाहीर होण्याच्या तारखेपासून पुढील १५ दिवसांमध्ये उमेदवारांचे गुण अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार असल्याचे यूपीएससीने नमूद केले आहे. 

या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय सैन्यदल (Indian Army), हवाई दल (Indian Air Force) आणि नौदलात (Indian Nary) भरती करण्यात येते. त्या आधी इंडियन मिलिट्री अॅकॅडमी (IMA) आणि इंडियन नेव्हल अॅकॅडमी (INA) मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते.

- UPSC NDA मेरिट लिस्ट पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT