Mahajyoti sakal
एज्युकेशन जॉब्स

UPSC Preparation : दिल्ली शक्य नसेल तर पुण्याचा पर्याय! ‘महाज्योती’कडून विद्यार्थ्यांना ‘यूपीएससी’ परीक्षा तयारीची संधी

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (महाज्योती) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) प्रशिक्षणासंदर्भात विद्यार्थ्याभिमूख निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (महाज्योती) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) प्रशिक्षणासंदर्भात विद्यार्थ्याभिमूख निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतील महागड्या प्रशिक्षणाऐवजी विद्यार्थ्यांना आता पुण्यात मराठी माध्यमातून प्रशिक्षण घेण्याची संधी देण्यात येणार आहे. दै. ‘सकाळ’नेही यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करत विद्यार्थ्यांची व्यथा मांडली होती.

मागासवर्गीय प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी ‘यूपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण व्हावे म्हणून, ‘महाज्योती’च्यावतीने विशेष तयारी करून घेण्यात येते. यासाठी दिल्ली आणि पुण्यात प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. असे असतानाही दिल्लीतील प्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे निदर्शनास आले होते. ज्यामध्ये जवळपास २०२ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्वतःचे प्रवेश रद्द केले होते.

अवाढव्य खर्च आणि मराठीतील नोट्सच्या अभावामुळे विद्यार्थ्यांनी दिल्लीतील प्रवेश नाकारल्याचे समजले होते. इंग्रजीतील प्रशिक्षणामुळे गुणवत्तेवर परिणाम होतो. तसेच मिळणारी शिष्यवृत्ती आणि दिल्लीतील महागड्या खर्चाचा कोणताच ताळमेळ नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

म्हणून पुण्यातील प्रशिक्षणासाठी अधिक जागा द्याव्यात, तसेच दिल्लीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुण्यात उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी उमेदवारांनी केली होती. अखेरीस महाज्योतीने याची दखल घेत सुधारित नियम प्रसिद्ध केले आहे.

इंग्रजी माध्यमामुळे आमच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता. दिल्लीतील प्रशिक्षण सर्वच विद्यार्थ्यांच्या हिताचे नव्हते. दैनिक सकाळने यासंदर्भात बातमी देत विद्यार्थ्यांची बाजू मांडली होती. अखेरीस ‘महाज्योती’ने आता दिलासादायक निर्णय घेतला आहे.

- फारुख, ‘महाज्योती’चा विद्यार्थी

‘यूपीएससी’ प्रशिक्षणासाठी दिल्लीतील जागा - १०००

पुण्यातील जागा - ७५०

बदलासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत - २३ फेब्रुवारी

असा आहे नवा नियम

ज्या विद्यार्थ्यांची ‘यूपीएससी’ प्रशिक्षणासाठी यापूर्वी निवड झाली होती, परंतु विविध कारणामुळे ते रुजू होऊ शकले नव्हते, अशा विद्यार्थ्यांना वाढलेल्या जागांनुसार मराठी माध्यम (पुणे) करिता सामावून घेण्याची संधी देण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी परिपत्रकाचे व अर्जाचे काळजीपूर्वक अवलोकन करावे.

आपली यापूर्वी ‘यूपीएससी’ प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्यास आणि आपण प्रशिक्षणाला रुजू न झाले असल्यास, आपला अर्ज दिलेल्या ई-मेल आयडीवर विहित मुदतीत सादर करावा, असे आवाहन महाज्योतीने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT