NDA google
एज्युकेशन जॉब्स

१२ वी उत्तीर्ण असणाऱ्यांना एनडीएत दाखल होण्याची संधी; ५६ हजार स्टायपेंड

NDAच्या आर्मी विभागासाठी राज्य शिक्षण मंडळातून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

नमिता धुरी

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी परीक्षेची (UPSC NDA 2 2022 Notification) सूचना काढली आहे. upsconline.nic.in या संकेतस्थळावर ही सूचना उपलब्ध आहे. ७ जूनपर्यंत चालणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये ४०० पदे भरली जातील.

NDAच्या आर्मी विभागासाठी राज्य शिक्षण मंडळातून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. नौदल आणि वायू दल विभागासाठी राज्य शिक्षण मंडळातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

२ जानेवारी २००४ ते १ जानेवारी २००७ या कालावधीत जन्म झालेले अविवाहीत पुरूष व महिला या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. खुल्या गटातील पुरुषांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क आहे. अनुसूचित जाती-जमाती आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. निवड झालेल्या उमेदवारांना ५६ हजार १०० रुपये विद्यावेतन दिले जाईल.

upsconline.nic.in या संकेतस्थळावर जाऊन ONLINE APPLICATION FOR VARIOUS EXAMINATIONS OF UPSC या लिंकवर क्लिक करा. येथे अर्ज उपलब्ध होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT