मुंबई महापालिकेत 'या' पदांची भरती! 24 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज Canva
एज्युकेशन जॉब्स

मुंबई महापालिकेत 'या' पदांची भरती! 24 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

मुंबई महापालिकेत 'या' पदांची भरती! 24 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

श्रीनिवास दुध्याल

दहावी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांकडून मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध विभागातील भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

सोलापूर : दहावी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांकडून मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वतीने विविध विभागातील भरतीसाठी (Jobs) अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदभरतीमध्ये (Recruitment) हाऊसमन पदांच्या एकूण 15 जागा भरण्यात येणार आहेत. कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहारतज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, ऑडिओलॉजिस्ट आणि कार्यकारी सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या भाभा रुग्णालय वांद्रे, व्ही. एन. देसाई रुग्णालय (सांताक्रुझ), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली, के. भी. भाभा रुग्णालय, कुर्ला, शताब्दी रुग्णालय, गोवंडी, राजावाडी रुग्णालय, घाटकोपर या उपनगरीय रुग्णालयांमध्ये डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड प्रोग्राम अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर भरती केली जाणार आहे.

पदांचा तपशील व अनुभव

  • कनिष्ठ ग्रंथपाल पदासाठी उमेदवाराकडे मुंबई विद्यापीठ किंवा तत्सम मान्यताप्राप्त विद्यापीठातील लायब्ररी सायन्समधील पदवी असणे गरजेचे आहे. अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

  • कनिष्ठ आहारतज्ज्ञ पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठात होम सायन्समधील पदवीधारक असावा किंवा डायटिस्ट, न्युट्रीशनमधील पदव्युत्तर पदवीधारक असावा.

  • ऑप्टोमेट्रिस्ट या पदासाठी उमेदवाराकडे दहावी ते ऑप्टोमेट्रिस्टमध्ये तीन वर्षाची पदवी, बारावी परीक्षेसह बीएससी ऑप्ट्रोमेट्रीस्टमधील पदवीधारक असावा.

  • ऑडिओलॉजिस्ट पदासाठी उमेदवार हा भारत, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा येथील मान्यताप्राप्त संस्थेतील ऑडियोलॉजी किंवा स्पीच थेरपीमधील पदवी किंवा पदवीधारक असावा.

  • कार्यकारी सहाय्यक या पदासाठी उमेदवार हा कला, वाणिज्य आणि विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. उमेदवार मराठी, इंग्रजी टायपिंग आणि एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असावा.

असा असेल पगार

कार्यकारी सहाय्यक पदासाठी 15 हजार रुपये पगार तर इतर सर्व पदांसाठी 25 हजार दरमहा पगार दिला जाणार आहे. यासाठी 16 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष येऊन अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी पत्ता

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, रोख विभाग, खोली क्र. 15, कॉलेज बिल्डिंग, तळमजला, लोकमान्य टिळक रुग्णालय, मुंबई या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. 24 सप्टेंबर ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या आणि अपूर्ण अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT