Girls Career Sakal
एज्युकेशन जॉब्स

करिअर घडविताना : युवती आणि करिअरची निवड

उत्तम शिक्षण घेण्याबरोबरच अर्थार्जनासाठीदेखील स्वत:स सक्षम करणे ही आजच्या स्त्रीची गरज आहे. तिने करिअर निवडताना काय करावे, याचा विचार करूयात.

सकाळ वृत्तसेवा

उत्तम शिक्षण घेण्याबरोबरच अर्थार्जनासाठीदेखील स्वत:स सक्षम करणे ही आजच्या स्त्रीची गरज आहे. तिने करिअर निवडताना काय करावे, याचा विचार करूयात.

- विद्या कुलकर्णी

उत्तम शिक्षण घेण्याबरोबरच अर्थार्जनासाठीदेखील स्वत:स सक्षम करणे ही आजच्या स्त्रीची गरज आहे. तिने करिअर निवडताना काय करावे, याचा विचार करूयात. महिलांनी करिअरची निवड करताना प्रामुख्याने पुढील मुद्दे विचारात घ्यायला हवेत. करिअर कसे असावे, पहिला पर्याय ः मी जे काम करते ते मला आवडते. दुसरा पर्याय - मला आवडते ते काम मी करते. यामध्ये दुसरा पर्याय करिअर म्हणून असावा असे वाटते. हे सूत्र धरले तर करिअरची निवड करताना तीन गोष्टींचा विचार केला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे, जे मला आवडते आणि जे मला करायला जमते, त्याची समाजाला गरज आहे का?

आवड असलेल्याची यादी करा

आपल्याला काय आवडते याची आधी एक यादी करा. त्यात बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव होईल. उदा. मला गणित, विज्ञान आवडते, फुटबॉल खेळायला आवडते, तबला ऐकायला आवडतो, चित्र काढायला आवडतात, ट्रेकिंगला जायला आवडते, स्वयंपाक करायला आवडते वगैरे. करिअरची निवड करताना आपल्या अंगभूत क्षमतांचा विचार करून त्या क्षमतांशी सुसंगत करिअरची निवड करणे योग्य ठरते. आपल्या क्षमतांचा विचार करताना मानसशास्त्रानुसार नऊ प्रकारच्या क्षमता (बुद्धिमत्ता) असतात हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

  • भाषिक बुद्धिमत्ता - भाषा, साहित्य, कविता इत्यादी क्षेत्रात अधिक गती असते.

  • गणिती बुद्धिमत्ता - गणित विषयात अधिक गती असते.

  • सांगीतिक बुद्धिमत्ता - संगीत, गायन, वाद्यवादन, श्रवण याविषयी अधिक गती असते.

  • नैसर्गिक बुद्धिमत्ता - दिशा, प्रदेश, भौगोलिक, परिस्थिती, प्राणी, पक्षी अशा विषयांत अधिक गती असते.

  • आध्यात्मिक बुद्धिमत्ता - आध्यात्मिक क्षेत्राची आवड, मनन, चिंतन, साधना अशा विषयात गती असते.

  • कारक बुद्धिमत्ता - हस्तकौशल्य, कलाकुसर, मैदानी खेळ अशा विषयांत अधिक गती असते.

  • आंतर-वैयक्तिक बुद्धिमत्ता - मोकळा स्वभाव, संवादकौशल्य, ज्याला इंग्रजीमध्ये extrovert म्हणतात. (असा स्वभाव असणारे मार्केटिंग क्षेत्रात प्राध्यापक शिक्षक या क्षेत्रात अधिक यशस्वी होण्याची शक्यता असते.)

  • आंतर-वैयक्तिक बुद्धिमत्ता - अबोल, संवाद-कौशल्ये नसलेला (introvert) एकट्याने एकाग्रपणे करायची कामे, संशोधन या क्षेत्रात यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.

  • दृक-श्राव्य बुद्धिमत्ता - जो कल्पनेने आकारमान, वस्तुमानाचा अंदाज करू शकतो, उदा. एखादा आर्किटेक्ट इमारतीचे डिझाईन करण्यापूर्वी कल्पनेने ती इमारत आधी पाहतो, मग कागदावर उतरवतो मग प्रत्यक्षात उभी करतो, अशा प्रकारची कल्पनाशक्ती

या क्षमतांपैकी आपल्याकडे कोणती क्षमता कमी-अधिक आहे, त्याचा अंदाज घ्यावा.

आपल्या मर्यादांचाही विचार केला पाहिजे. यात सामान्यपणे बौद्धिक, शारीरिक, आर्थिक, पारिवारिक मर्यादांचा विचार केला पाहिजे. उगाचच बहुतांश विद्यार्थी इंजिनिअरिंग मेडिकल शाखेकडे जातात, म्हणून आपण जाण्याचा विचार करणे योग्य नाही आपली बौद्धिक क्षमता नसेल तर करिअरचा दुसरा चांगला मार्ग निवडता येऊ शकतो.

करिअरसाठी क्षेत्र निवडताना आपल्या आवडीचाही विचार करावा. सध्या टी.व्ही., इंटरनेट, सोशल मिडियाच्या जमान्यात कलेचे करिअर करण्याच्या खूप संधी उपलब्ध आहेत. आपल्याकडे जी कोणती कला असेल त्यात प्रावीण्य मिळवून कलेच्या क्षेत्रात चांगले नाव कमावता येते. परंतु कलेचे करिअर करण्याचा मार्ग तुलनेने सोपा आहे असे समजू नका, त्याही मार्गात खूप स्पर्धा असल्याने आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी खूप अभ्यास आणि कष्ट करावे लागणार आहेत.

मुबलक पर्याय

कष्ट करून आपले भविष्य घडविण्याची उमेद असलेल्या सर्व स्तरांतील मुलींसाठी दहावी आणि बारावीनंतर शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. यात पारंपरिक शिक्षणाबरोबरच मर्यादित कालावधीचे व खात्रीलायक व्यावसायिक संधी मिळवून देणारे अनेक पर्याय चोखाळता येऊ शकतात. यात महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन प्रमाणित विविध पदविका अभ्यासक्रम आहेत. याशिवाय ब्यूटी कल्चर, कॉस्च्युम डिझायनिंग, वेब मार्केटिंग डेव्हलपर, पंजाबी ड्रेस मेकिंग, फूड प्रोसेसिंग आणि बेकरी, ज्वेलरी मेकिंग, मेहंदी कोर्स, मसाला मेकिंग, एम. एस. ऑफिस, पिकल मेकिंग, पेपर बॅग मेकिंग, आईस क्रीम मेकिंग, चॉकलेट मेकिंग, पंजाबी फूड मेकिंग असे एक वर्षापासून ते अवघ्या तीन दिवसांपर्यंतचा कालावधी असलेले, व्यावसायिक संधी देणारे आणि मुख्य म्हणजे कुणालाही सहज परवडू शकतील असे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

‘परदेशी भाषा’ या क्षेत्रांतही करीअरच्या उत्तम संधी आहेत. जर्मन, जपानी, फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन अशा विविध परदेशी भाषा शिकण्यासाठीचे असेच मर्यादित कालावधीचे आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध असतात, त्याद्वारे या क्षेत्रात प्रवेश मिळवता येऊ शकतो. याबरोबरच समुपदेशन हीदेखील या काळामध्ये सर्व क्षेत्रांची गरज बनलेली आहे. चाइल्ड काउन्सेलिंग, मॅरेज काउन्सेलिंग अशा विषयावरील छोट्या कालावधीचे कोर्सेस यासाठी निवडता येऊ शकतात. याव्यतिरिक्त अनेक छोटी-मोठी कार्यालयीन कौशल्ये, संवाद कौशल्ये, लेखन कौशल्ये आदी आत्मसात करून त्या आधारवरही आपला भविष्याचा मार्ग प्रशस्त करता येऊ शकतो.

(लेखिका महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपकार्याध्यक्षा आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

Manoj Jarange Patil: मध्यरात्री अंतरवालीत घडलं मोठं नाट्य; सरकार-जरांगे चर्चेचा निकाल काय? जाणून घ्या आतली माहिती

'या' अभिनेत्रीच्या तोंडाचा येत होता वास, बॉबी देओलने किसिंग सीन देण्यास दिला स्पष्ट नकार, नक्की काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT