mumbai university
mumbai university sakal media
एज्युकेशन जॉब्स

मुंबई विद्यापीठात नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाला मान्यता; विद्या परिषदेत निर्णय

संजीव भागवत

मुंबई : देशातील विविध क्षेत्रातील संशोधन, आणि त्यासोबतच उद्योग,व्यवसायाची गरज लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने (Mumbai university) पुढील शैक्षणिक वर्षात अनेक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम (new syllabus) आणण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या झालेल्या बैठकीत यासाठीचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये प्रमाणपत्र आणि पदव्यूत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा (Degree certificate) समावेश आहे. यासोबतच विद्यापीठात प्रगत संशोधन आणि अभ्यासासाठी विद्यापीठात लवकरच ‘एमयु एक्सलेटर सेंटर’ची स्थापना केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

या केंद्राच्या माध्यमातून अत्यंत प्राचीन संस्कृती, मानवनिर्मित साहित्य, पुरातन काळातील अनेक बाबींबरोबरच बायोमेडिकल आणि अणूऊर्जेच्या संशोधनात महत्वाची भूमिका बजावणार आहे. भूगर्भशास्त्र, वनस्पती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राबरोबरच इतिहासावर देशातील विविध भागांमध्ये परिमाणवाचक अभ्यासासाठी आणि शास्त्रोक्त संशोधनासाठी या केंद्राची भूमिका महत्वाची ठरणार आहे. या केंद्राच्या सुविधेचा लाभ फक्त मुंबई विद्यापीठापुरताच मर्यादीत न ठेवता या सुविधेचा लाभ सर्व विद्यार्थी, संशोधक आणि शास्त्रज्ञांना उपलब्ध होऊ शकेल याचे नियोजन विद्यापीठामार्फत केले जाणार असल्याची माहितीही विद्यापीठाकडून देण्यात आली.

संशोधनासाठी प्रोत्साहन

विद्या परिषदेने दिलेल्या मान्यतेनुसार विद्यापीठात संशोधनासाठी अनेक दालन उपलब्ध हेाणार आहेत. यात सेंटर फॉर एक्सलेंस इन बेसिक सायन्स, सेंटर फॉर एक्सलेंस इन थेअरॉटिकल अँड कम्प्युटेशनल सायन्सेस, एनर्जी स्टडीज, मॅरिटाईम स्टडीज, स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स अँड स्ट्रॅटजिक स्टडीज, सेंटर फॉर हिंदू फिलॉसॉफिकल स्टडीज, सेंटर ऑफ एक्सलेंस इन स्पोर्ट्स सायन्स अँड स्पोर्ट्स मॅनेजमेट, एक्सट्रा म्यूरल स्टडीज, प्रो. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टूडंट अँड यूथ मुव्हमेंट, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र, बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल रिसर्च सेंटर अशा केंद्रामार्फत संशोधनाला प्रोत्साहन दिले जाणार.

नवीन अभ्यासक्रम

बीकॉम/बीबीए/ बीएमएस इन मॅनेजमेंट अँड स्पोर्ट्स एडमिनिस्ट्रेशन

बीकॉम/बीबीए/ बीएमएस इन हॉस्पीटॅलिटी मॅनेजमेंट अँड स्पोर्ट्स स्टडीज

बीकॉम/बीबीए/ बीएमएस इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट

बीएस्सी इन आर्टीफिशिअल इंटेलिजंस अँड स्पोर्ट्स अनॅलिटिक्स

बीएस्सी इन डेटा सायन्स अँड स्पोर्ट्स स्टडीज

एमबीए (इनोवेशन, आंतरप्रुर्नशिप अँड व्हेंचर डेव्हलमेंट)

सर्टिफिकेट कोर्स इन गार्डनिंग अँड नर्सरी मॅनेजमेंट

सर्टीफिकेट कोर्स इन ऑर्गेनिक फार्मिंग

सर्टिफिकेट कोर्स इन कल्टीव्हेशन ऑफ स्पाईस प्लांट

पोस्ट ग्रॅज्युअट डिप्लोमा इन बायोडायव्हर्सिटी असेसमेंट अँड कन्झर्वेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT