BCA Education Sakal
एज्युकेशन जॉब्स

वेध करिअरचा : ‘बी.सी.ए.’ आश्वासक क्षेत्र

‘बी.सी.ए.’ म्हणजेच बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स. बी.सी.ए. हा तीन वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम आहे.

सकाळ वृत्तसेवा

‘बी.सी.ए.’ म्हणजेच बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स. बी.सी.ए. हा तीन वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम आहे.

- प्रा. विजय नवले

‘बी.सी.ए.’ म्हणजेच बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स. बी.सी.ए. हा तीन वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम आहे. बी.सी.ए. शिक्षणात सॉफ्टवेअरमधील बेसिक ॲप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या संदर्भातील अभ्यासक्रम असतो.

‘बी.सी.ए.’साठी बारावीचे शिक्षण पूर्ण असावे. पारंपरिक विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी कोणतीही प्रवेशपरीक्षा नाही. काही स्वायत्त विद्यापीठे किंवा काही विद्यापीठे प्रवेशपरीक्षा घेतात. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स अशा कोणत्याही शाखेतील बारावी झालेला विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असतो. बारावीमध्ये किमान ५० टक्के गुण असावेत. ही अट ५ टक्क्याने राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी शिथिल असते. तर काही विद्यापीठांमध्ये ४५ टक्के ही संपूर्ण गुणांची अट असते. बारावीत संगणक हा विषय असायलाच हवे असे काही अपेक्षित नसते. त्याचप्रमाणे काही विद्यापीठांमध्ये गणित हा विषय नसेल तरीही ‘बी.सी.ए.’ ला प्रवेश मिळू शकतो. इंग्रजी विषय मात्र अपेक्षित आहे. पारंपरिक विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालये, स्वतंत्र विद्यापीठे, खासगी महाविद्यालये अशा ठिकाणी हा कोर्स करता येतो. सध्याच्या बदलत्या काळात ऑनलाइन पद्धतीने देखील ‘बी.सी.ए.’ करता येऊ शकते.

अभियांत्रिकीच्या चार वर्षीय अभ्यासक्रमाशी याची थेट तुलना करता येणार नाही. अभियांत्रिकीला प्रवेश मिळतोय, चांगले मार्क्स आहेत, गुणवत्ता देखील आहे अशा विद्यार्थ्यांनी तसा अभियांत्रिकीचा प्रवेश टाळून केवळ सोपा कोर्स वाटतोय आणि तीन वर्षे हा कमी कालावधी आहे म्हणून ‘बी.सी.ए.’ करू नये. परंतु अभियांत्रिकीचा मोठा अभ्यासक्रम झेपणार नाही असे ज्यांना वाटते, ज्यांना अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला नव्हता त्यांनी संगणक क्षेत्रासंबंधित कामाच्या कमी कालावधीच्या सोप्या वाटणाऱ्या ‘बी.सी.ए.’ अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा. अर्थात बी.ई. कॉम्प्युटरप्रमाणे नोकरीच्या व्यापक आणि जास्त पगाराच्या नोकऱ्या सुरुवातीला तरी लगेच उपलब्ध होणार नाहीत. त्यासाठी ‘एम.सी.ए.’च्या वाढीव तीन वर्षीय अभ्यासक्रमाचा आधार घ्यावा लागेल. ‘बी.सी.ए.’ नंतर काही विद्यार्थी नोकरी करतात, काही विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेतात.

स्पर्धापरीक्षा, व्यवस्थापन क्षेत्र, उद्योजकता यामध्ये सुद्धा विद्यार्थी ‘बी.सी.ए.’ नंतर जाऊ शकतात. ‘बी.सी.ए.’ हा इंजिनिअरिंग, मेडिकलसारखा मोठा करिअर ऑप्शन नसला तरीही प्रामाणिक मेहनतीच्या आधारे अशा शिक्षणानंतर संगणक क्षेत्रातील मुख्य प्रवाहात येता येते. काहींना थेट प्रोग्रॅमर नाही पण संगणकीय प्रणालींशी जवळीक असणाऱ्या काही जबाबदाऱ्यांवर वर्णी लागू शकते. त्यासाठी कष्ट करायची तयारी हवी. ज्यांना हे शिक्षण केवळ कोणती तरी पदवी म्हणून घ्यायची आहे त्यांच्यासाठी करिअरचे अन्य मार्ग उपलब्ध असतात. संगणकाची आवड असणाऱ्यांनी या शिक्षणाचा विचार करायला हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT