एज्युकेशन जॉब्स

रि-स्किलिंग : नोकरीत मुत्सद्देगिरीही गरजेची!

विनोद बिडवाईक

संस्थेमधील राजकारणाबद्दल आपण नेहमीच बोलत असतो. एखाद्या संस्थेपासून राजकारण आपल्याला वेगळे करता येत नाही. मुळात हे त्याज्य असू शकत नाही. राजकारण म्हणजे काय हे समजून न घेता किंवा राजकारणाची कारणे कोणती आहेत हे समजून न घेता आपण संस्थेमधील सत्ता आणि राजकारणाबद्दल बोलत असतो. सत्ता आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या एकत्र आणि समांतरपणे संस्थेमध्ये वास करत असतात. संस्था एखादी निर्जीव वास्तू नसून, वेगवेगळ्या व्यक्तींच्या तेथे काम करणाऱ्या लोकांच्या स्वभावाच्या अथवा मानसिक प्रवृत्तीपासून बनलेली असते. समाजातील वेगवेगळ्या व्यक्ती एकत्र काम करतात, तेव्हा थोड्याफार प्रमाणात एकमेकांबद्दल हेवेदावे, स्वतःला सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या युक्त्या, हे सर्व गृहीतच धरायला हवे.  संस्थेतील राजकारण हे देशातील अथवा राज्यातील राजकारणापेक्षा अतिशय वेगळे असते. संस्थेमधील राजकारण हे उच्चस्तरीय लोकांच्या मानसिकतेवर अवलंबून असते.

स्वतःचे कार्य साध्य करण्यासाठी वापरण्यात आलेल्या युक्त्या या राजकारणाचा भाग असतात; हे सर्व संस्थेच्या भल्यासाठी केलेले असल्यास त्याला सकारात्मक म्हणता येईल. याला राजकारणापेक्षा मुत्सद्दीपणा म्हणणे योग्य ठरेल. स्वतःची खुर्ची टिकवून ठेवण्यासाठी वापरलेल्या युक्त्यांना नकारात्मक राजकारण म्हणता येईल. स्वतःची खुर्ची टिकून ठेवण्यासाठी  राजकारण करायची गरज पडत असल्यास ती व्यक्ती संस्थेमध्ये काम करण्यासाठी योग्य नाही. एखाद्या संस्थेत काम करताना किंवा एखादा नोकरी बदलताना या राजकारणाचा आणि तेथील सत्ताकेंद्राचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.  हे आपल्या स्वभावाला जुळत नसल्यास  स्वतःला मनस्ताप होण्याची शक्यताच जास्त असते. त्यामुळे नेहमी संस्थेतील राजकारण हे एखादे कार्य साध्य करण्यासाठी आवश्यक ठरते. सध्याच्या प्रोफेशनल जगात खुर्ची टिकवण्यासाठी करण्यात आलेले राजकारण हे सहसा जास्त वेळ टिकत नाही. अशा व्यक्ती योग्य वेळेस बाजूला केल्या जातात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यामुळे आपले कार्य साध्य करण्यासाठी, आपली कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी मुत्सद्देगिरीचा आधार घ्यावाच लागतो; त्यात वावगे काहीही नाही. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायचे असल्यास संस्थेमध्ये मुत्सद्दी राहूनच कार्य करावे लागते, काही जण यालाही राजकारण म्हणू शकतात.

राजकारण दोन गोष्टीसाठी आवश्यक असते...
1) स्वतःचे कार्य साध्य करण्यासाठी
2) स्वतः ची खुर्ची टिकवून ठेवण्यासाठी

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना गुडन्यूज! ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा, सरकारकडून मोठी भेट

MNS Leader Arrest : राज ठाकरेंच्या शिलेदाराला फसवणूक प्रकरणात अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Super El Nino: यंदा सर्वाधिक उष्ण उन्हाळा; पाणीसंकटही तीव्र होणार ; ‘सुपर अल निनो’कडे वाटचाल

Latest Marathi News Live Update : मनोज जरागेंच्या ११ समर्थकांविरोधात गुन्हा

Ranya Rao Gold Smuggling Case : 89 कोटींचा दंड अन् 244 कोटींची कारवाई! कन्नड अभिनेत्री रन्या राव सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकली, 399 पानांचा आदेश जारी

SCROLL FOR NEXT