Viral Tweet
Viral Tweet google
एज्युकेशन जॉब्स

Viral Tweet : जॉब ऑफर करणाऱ्या सीईओला महिलेने दिलं असं उत्तर की दोन वर्षांनंतरही तो विसरला नाही

नमिता धुरी

मुंबई : एका कंपनीच्या सीईओ आणि फाऊंडरने एका महिलेला जॉबची ऑफर दिली. महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. आपल्या कंपनीत काम करण्याची इच्छा आहे का असे विचारल्यानंतर त्या महिलेने जे उत्तर दिले त्यावर तो सीईओ अजूनही विचार करतो आहे.

हा किस्सा आहे हेल्थकेअर स्टार्टअप वॉलनटचे फाऊंडर रोशन पटेल यांचा. ही गोष्ट सप्टेंबर २०२१ची आहे. त्यावेळी वॉलनटने प्रीसीड राऊंडमध्ये निधी जमा केला होता.

रोशन पटेल आपली टीम वाढवत होते. त्यांना आपल्या कंपनीसाठी हुशार लोकांची गरज होती. त्यावेळी त्यांनी एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरला जॉब ऑफर केला. (viral tweet of roshan patel walnut CEO)

महिलेने उत्तरादाखल लिहिले होते की, माझी करंट सीटीसी तुमच्या कंपनीने जमा केलेल्या निधीपेक्षा अधिक आहे. महिलेने दिलेल्या या उत्तरावर रोशन पटेल आजही विचार करत असल्याचं त्यांनी एका ट्विटमधून सांगितलंय.

ट्विटला ३० लाखांहून अधिक व्ह्यूज आणि २४ हजारांहून अधिक लाइक्स आहेत. इंजिनिअर महिलेचे उत्तर वाचून सोशल मीडिया यूजर्सनाही आश्चर्य वाटत आहे.

न्यूयॉर्कस्थित वॉलनटने २०२२ साली प्री-सीड राऊंडमध्ये ३.६ दशलक्ष डॉलर जमा केले होते. त्यामुळे त्या महिलेला नक्की किती पगार मिळत होता असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

एआयचा वापर करून बनावट लिंक्डइन प्रोफाईल बनवल्यामुळे रोशन पटेल अलीकडे चर्चेत आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचे बचावकार्य तब्बल ६० तासांनंतर पुर्ण; मुंबई पालिका आयुक्तांनी दिली माहिती

Share Market Today: जागतिक बाजारात जोरदार तेजी; आज कसा असेल शेअर बाजार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Amit Shah on Kejriwal's bails: 'केजरीवाल यांना विशेष वागणूक मिळाली...', जामिनावर अमित शाहांचा हल्लाबोल

Timepass 3 Fame Actress: ‘टाईमपास 3’ फेम अभिनेत्रीला झालाय 'हा' आजार; पोस्ट शेअर करत म्हणाली, "मी गरोदर नाहीये हे..."

Latest Marathi News Live Update : "पुण्यातील बेकायदा होर्डिग्ज 7 दिवसांच्या आत हटवा" महापालिका आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT