Career Opportunity
Career Opportunity Sakal
एज्युकेशन जॉब्स

संधी करिअरच्या... : बायोटेक्नॉलॉजीमध्ये संधींचा महापूर...

विवेक वेलणकर

कोरोना महामारीच्या जागतिक संकटानंतर आरोग्य शास्त्रात संशोधनाच्या संधींना सुगीचे दिवस आले आहेत, विशेषतः सूक्ष्मजीव शास्त्र, बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या शाखांचे महत्त्व व उपयुक्तता सगळ्यांनाच पटू लागली आहे.

बायोटेक्नॉलॉजी या विषयाची व्याप्ती प्रचंड आहे. यामध्ये जेनेटिक्स , बायोकेमिस्ट्री, सूक्ष्मजीव शास्त्र , इम्युनॉलॉजी, केमिस्ट्री व्हायरॉलॉजी असे अनेक विषय येतात. आरोग्य, औषधे, पशुवैद्यक, कृषी तंत्रज्ञान , पीक शास्त्र , पर्यावरण, मृदाशास्त्र अशा अनेक शाखांमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा थेट वापर होत आहे. बायोटेक्नॉलॉजीशी सर्वांत निगडित शाखा म्हणजे बायोलॉजी. याद्वारे बायो इन्फर्मेटिक्स, सूक्ष्मजीव शास्त्र, जेनेटिक इंजिनिअरिंग या नवीन तंत्रज्ञानाचा विकास अधिकतम होतो. तसेच ऍनिमल व प्लॅन्ट टिश्यू कल्चरद्वारा नवीन निरोगी पिढी अस्तित्वात येत आहे. ॲनिमल व प्लॅन्ट पॅथॉलॉजी, एक्झो बायोलॉजी , मरीन बायोलॉजी, ॲनाटॉमी, आहारशास्त्र, प्रदूषण, मेडिकल टेक्नॉलॉजी, विषाणू शास्त्र, फार्माकॉलॉजी, बिहेवियरल सायन्स या शाखांना ही बायोटेक्नॉलॉजीचा संदर्भ घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

इंटिग्रेटेड बायोटेक्नॉलॉजी कोर्स

पुणे विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान केंद्रामध्ये पाच वर्षांचा इंटिग्रेटेड बायोटेक्नॉलॉजी कोर्स आहे. यामध्ये बारावीनंतर प्रवेश मिळालाच तर विद्यार्थी थेट एमएस्सी करूनच पाच वर्षांत बाहेर पडतो. या कोर्सच्या प्रवेशासाठी बारावीनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा पुणे विद्यापीठ घेते.‌ यामध्ये दोन पेपर्स असतात. पहिला पेपर वीस मार्कांचा असतो, ज्यात सामान्य ज्ञान, बुद्धीमत्ता चाचणी व इंग्रजी यांवर आधारित प्रश्न असतात, तर दुसऱ्या पेपरमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री , बायोलॉजी व मॅथेमॅटिक्स या विषयावर प्रश्न असतात‌. अधिक माहितीसाठी www.unipune.ac.in या संकेतस्थळावरील IBB विभागाच्या सेक्शनला भेट द्या.

शिक्षण काय हवे?

वैद्यकीय क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्रातही बायोटेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. फिशरी सायन्स, सेरीकल्चर, ॲक्वाकल्चर , जर्मीकल्चर, सीड व फूड टेक्नॉलॉजी, डेअरी सायन्स, फूड प्रोसेसिंग व प्रिझर्वेशन, उद्यान शास्त्र अशा अनेक शाखांमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. या सर्व पार्श्वभूमीवर बारावीनंतर बायोटेक्नॉलॉजी या शाखेत जाण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. या शाखेमध्ये जायचे असेल, तर अकरावी, बारावीला फिजिक्स, केमिस्ट्री , बायोलॉजी व मॅथेमॅटिक्स हे चारही विषय घेणे आवश्यक आहे. बारावीनंतर बीएसस्सी बायोटेक्नॉलॉजी हा कोर्स महाराष्ट्रातील शंभराहून अधिक महाविद्यालयांत उपलब्ध आहे. मात्र, बायोटेक्नॉलॉजी हे विस्तारणारे क्षेत्र असले तरी या क्षेत्रात संशोधनपर काम करणाऱ्यांनाच भरपूर संधी उपलब्ध आहेत. म्हणजेच, किमान पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा खरेतर ‘पीएचडी’पर्यंत शिकल्यानंतरच या क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध होतात हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. बारावी ला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व मॅथेमॅटिक्स हे चारही विषय घेतलेल्या आणि बारावीनंतर महाराष्ट्राची इंजिनिअरिंग सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना बायोटेक इंजिनिअरिंग नावाच्या शाखेतून अभियांत्रिकी पदवीही घेता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT