Cost Reduction
Cost Reduction Sakal
एज्युकेशन जॉब्स

संधी करिअरच्या... : कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट अकाउंटंट

विवेक वेलणकर

वाढत्या स्पर्धेमुळे सर्वच औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रात कॉस्ट नियंत्रणाला अत्यंत महत्त्व आले आहे. कॉस्ट नियंत्रण व नियोजन यांचे शिक्षण देणारे अभ्यासक्रम ‘दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट अकाउंटंट ऑफ इंडिया’ या स्वायत्त संस्थेमार्फत राष्ट्रीय पातळीवर चालवले जातात. त्यांच्यातर्फे कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट अकाउंटंट अर्थात सीएमए परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षांमध्ये तीन स्तर असतात, ते म्हणजे फाऊंडेशन, इंटरमिजिएट व फायनल परीक्षा. या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सीएमएची पदवी मिळते.

बारावी उत्तीर्ण किंवा बारावीची परीक्षा त्या वर्षी दिलेले विद्यार्थी फाऊंडेशन परीक्षा देऊ शकतात. यासाठी किमान सहा महिने अगोदर संस्थेकडे नोंदणी करावी लागते. याशिवाय या अभ्यासक्रमाची पत्राद्वारे, व्याख्यानाद्वारे शिकवणी पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही द्यावे लागते. परीक्षा वर्षांतून दोनदा घेतली जाते. या परीक्षेत चार पेपर असतात. या चारही विषयांत मिळून किमान पन्नास टक्के गुण व प्रत्येक विषयात किमान चाळीस टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित केले जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट परीक्षा देता येते. यासाठी किमान सहा महिने अगोदर संस्थेकडे नोंदणी करावी लागते. याशिवाय या अभ्यासक्रमाची पत्राद्वारे, व्याख्यानाद्वारे शिकवणी पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही द्यावे लागते. हा अभ्यासक्रम बारा महिन्यांचा असतो. या परीक्षेचे दोन ग्रुप असतात व प्रत्येक ग्रुपमध्ये चार विषयांचे पेपर असतात. चारही विषयांत मिळून किमान पन्नास टक्के गुण व प्रत्येक विषयात किमान चाळीस टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ग्रुपमध्ये उत्तीर्ण घोषित केले जाते. इंटरमिजिएट परीक्षेच्या दोन्ही ग्रुपमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फायनल परीक्षा देता येते. हा अभ्यासक्रम किमान बारा महिन्यांचा असतो. यासाठी किमान सहा महिने अगोदर संस्थेकडे नोंदणी करावी लागते. या परीक्षेत ही दोन ग्रुप असतात व प्रत्येक ग्रुपमध्ये चार विषयांचे पेपर असतात. फायनल परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना पंधरा महिन्यांचा कार्यानुभव घ्यावा लागतो. व्याख्यानाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण केला तर दुसऱ्या कोणत्याही मार्गदर्शनाची गरज पडत नाही.

सीएमए अभ्यासक्रमाची अधिक माहिती www.icmai.in या संकेतस्थळावर मिळेल. सीएमए झालेले विद्यार्थी कॉस्ट ऑडिट, स्टॉक ऑडिट, इंटर्नल ऑडिट, बॅंकींग, इन्शुरन्स, प्रोजेक्ट फायनान्स, ईआरपी सल्लागार, कर सल्लागार, प्राध्यापक, औद्योगिक/व्यावसायिक सल्लागार, प्राध्यापक म्हणून काम करू शकतात. भारतातून कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट अकाउंटंट झालेल्या विद्यार्थ्यांना इंग्लंडमध्ये फक्त थोड्या विषयांची परीक्षा देऊन तिथली सीएमए पदवी मिळू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमारकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT