Career Opportunity
Career Opportunity Sakal
एज्युकेशन जॉब्स

संधी करिअरच्या... : दहावी व बारावीनंतरची शाखा निवड

विवेक वेलणकर

यंदा दहावी बारावीच्या परीक्षा वेळेवर होतील अशी अपेक्षा आहे, आणि त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शाखा निवड लवकरच करावी लागणार आहे.

जवळपास वर्षभर या सदरातून आपण दहावी आणि बारावी नंतर करिअर निवडताना काय काळज्या घ्याव्यात, दहावीनंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, होमसायन्स ,इंजिनिअरिंग डिप्लोमा, आयटीआय यापैकी कोणती शाखा निवडावी आणि कशाच्या आधारावर निवडावी याची माहिती घेतली. कोणत्या शाखेतून बारावीनंतर कोणकोणत्या कोर्सेस ना प्रवेश मिळू शकतो , त्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात अशा अनेक गोष्टींची माहिती आपण घेतली . गेली वीस बावीस वर्षे करिअर समुपदेशक म्हणून हजारो पालक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधल्यानंतर आलेले अनुभव मांडण्याचा प्रयत्न केला. ज्या अनेक विद्यार्थी व पालक यांनी फोन ईमेल द्वारे संपर्क साधून सदर आवडल्याचे आवर्जून सांगितले त्यांना मनापासून धन्यवाद.

यंदा दहावी बारावीच्या परीक्षा वेळेवर होतील अशी अपेक्षा आहे, आणि त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शाखा निवड लवकरच करावी लागणार आहे या पार्श्वभूमीवर विशेषतः दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगणे आवश्यक आहे.

दुर्दैवाने आपल्याकडे पालकांचा समज असा आहे की फक्त सायन्स शाखेतूनच करिअरचे भरपूर पर्याय उपलब्ध होतात आणि म्हणून किमान अकरावी, बारावी त तरी सायन्स शाखा निवडावी आणि मग बारावी नंतर पाहिजे तर कॉमर्स किंवा आर्ट्स शाखा निवडता येईल असा विचित्र समज करून घेऊन हट्टाने सायन्स शाखा निवडली जाते, मग भले दहावीपर्यंत विद्यार्थ्याला सायन्सचे विषय मनापासून आवडले असोत वा नसोत. खरं तर करिअरचे असे असंख्य पर्याय आहेत की ज्यामध्ये दहावीनंतर सायन्स/कॉमर्स/आर्ट््‌स, अशा कोणत्याही शाखेची निवड केली तरी चालू शकते. फाईन आर्ट््‌स , फॅशन/ इंटिरियर डिझाइन , कायदा , हॉटेल मॅनेजमेंट, बीबीए, बीसीए, बीबीएम, एमबीए, डिफेन्स, पत्रकारिता, स्पर्धा परीक्षा, बॅंकिंग, विमा, ट्रॅव्हल/टुरिझम, सेल्स/ मार्केटिंग, हार्डवेअर/नेटवर्किंग, ऍनिमेशन, बीपीओ/ कॉल सेंटर, अर्थशास्त्र, गणित/संख्याशास्त्र अशा विविध क्षेत्रात करिअर करण्यासाठी दहावीनंतर कोणतीही शाखा निवडलेली चालू शकते हे विद्यार्थी आणि पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे.

मुळातच कुठलेच क्षेत्र करिअर करण्यासाठी बिनमहत्त्वाचे नसते, प्रत्येक क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी विपुल संधी असतातच, फक्त त्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड ओळखून दहावी-बारावीनंतर शाखा निवड करणे गरजेचे आहे, अर्थात फक्त आवडीच्या विषयात करिअर करण्याचा निर्णय घेऊन भागत नाही, तर त्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी मनापासून भरपूर कष्ट करणे आवश्यक आहे. नोकरीबरोबरच स्वयंरोजगार हाही उत्तम पर्याय आहे, हेही विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवावे.

यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन वर्षभर या सदरातून विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘सकाळ’ला मन:पूर्वक धन्यवाद देतो.

(समाप्त)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT