Career Opportunity
Career Opportunity Sakal
एज्युकेशन जॉब्स

संधी करिअरच्या... : स्वयंरोजगार उत्तम पर्याय

विवेक वेलणकर

भारतात आजमितीला १५ ते ५५ वर्षे या वयोगटातील कार्यप्रवण लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त आहे. खरंतर इतर देशांनी या बाबतीत आपला हेवा करावा अशी परिस्थिती आहे. परंतु आपल्याकडे केंद्र सरकार पासून सर्वच पातळ्यांवर या हातांना रोजगार कसा मिळवून द्यावा याची चिंता सतावते आहे. आजही रोजगार म्हणजे नोकरी हाच विचार सर्व पातळ्यांवर केला जातो, मात्र यापुढच्या काळात सरकारी तसेच खासगी क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचं प्रमाण कमीच असणार आहे त्यामुळे या बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नावर स्वयंरोजगार हा एकमेव प्रभावी उपाय ठरणार आहे यात शंका नाही. दुर्दैवाने आपल्याकडे ‘स्वयंरोजगार’ या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

‘उत्तम नोकरी कनिष्ठ व्यवसाय’ ही मानसिकता लहानपणापासून बिंबवली जाते. लहानपणापासून मुलांच्या मनावर ‘चांगलं शिक! मोठ्या पगाराची नोकरी मिळव’ हाच संस्कार केला जातो. अजूनही स्वयंरोजगार ही संकल्पना करिअर म्हणून पचनी पडत नाही. आजही अभ्यासात फार प्रगती नसलेल्या मुलाला पालक/शिक्षक ‘मोठेपणी भेळेची गाडी लावणार आहे का’ असे हेटाळणीने विचारतात. भेळेची गाडी उत्तम चालवणारा माणूस आज संघटित क्षेत्रात कारकुनी करणाऱ्यांपेक्षा कितीतरी अधिक कमावतो. परंतु श्रमप्रतिष्ठेला महत्त्व न देण्याच्या आपल्या सामाजिक दृष्टिकोनामुळे आपण त्याला दुय्यम समजतो. स्वयंरोजगार हे उत्तम करिअर आहे ही भावना रुजविणे हे आज मोठं आव्हान आहे.

स्वयंरोजगाराचे महत्त्व मुलांच्या मनावर शालेय जीवनातच बिंबवले गेले पाहिजे. निर्णयक्षमता, प्रेझेंटेशन, निरीक्षण शक्ती यांसारख्या गोष्टी रंजक पद्धतीने मुलांपर्यंत पोचवणे तसेच ग्राहक, साधनसामग्री, विपणन यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पना सोप्या भाषेत शिकवणे यांसारख्या गोष्टी शालेय पातळीवरच केल्या गेल्यास उद्याच्या पिढीत स्वयंरोजगार हेही उत्तम करिअर आहे हे रुजवता येईल. अगदी छोट्या गोष्टींमधून शाळेपासूनच मुलांना या गोष्टी शिकवता येतात. मध्यंतरी एका शाळेत गेलो होतो, तिथल्या भिंतीवर रंगवलेले एक वाक्य ‘मी नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा होणार’ हे वाचून मनस्वी समाधान झाले.

स्वयंरोजगार करण्यासाठी पैशांचं नाही तर कल्पनेचं भांडवल लागतं, समाजाची गरज ओळखता यावी लागते मग लहान स्वरूपात सुरू केलेला व्यवसाय मोठे रूपही धारण करू शकतो. पुण्याच्या बापू पोतदारांचं उदाहरण इथे देणे आवश्यक आहे. जवळपास चाळीस वर्षांपूर्वी पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचा व्यवसाय त्यांनी एका सहाय्यकासह दुचाकीवरून सुरू केला, समाजाची गरज ओळखून सुरू केलेला हा व्यवसाय अविरत कष्टाने उंचीवर नेऊन ठेवला आणि तो बापूज् सर्व्हिसेस या नावाने ओळखला जातो.

एकुणातच स्वयंरोजगार हेही एक उत्तम करिअर आहे हे जाणून घेऊन नोकरीच्या मागे न पळता भरपूर कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारातून समृद्धी मिळू शकते हे निर्विवाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT