RTE File Photo
एज्युकेशन जॉब्स

Education News : शाळाबाह्य मुलांची जबाबदारी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या बैठकीत निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नंदोरी : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा नियमित आढावा घेणे, त्यांना शाळेत दाखल करणे, पालकांना मार्गदर्शन करणे या व इतर शाळाबाह्य विद्यार्थ्यांसंबंधी कामे करण्याची जबाबदारी आता जिल्हास्तरावर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. नोडल अधिकारी म्हणून ते ही जबाबदारी सांभाळणार आहेत.

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने नुकतीच दिल्ली येथे बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शाळाबाह्य मुलांबाबतची कार्यवाही तीन ते पाच वर्षे वयोगटासाठी बालविकास अधिकारी, सहा ते चौदा वर्षे गटासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी, चौदा ते अठरा वर्षे वयोगटासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, जिल्हानिहाय संपूर्ण माहिती संकलन करून त्याची केंद्र शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंद करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना नोडल अधिकारी नियुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांशी संबंधित विषयावर जिल्ह्यातील शाळांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या कार्यवाहीवर नियंत्रण ठेवणे, राज्यस्तरावरून निगरमित केल्या सूचनांची अंमलबजावणी जिल्हा स्तरावर करण्याची जबाबदारी नोडल अधिकाऱ्यांची राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT