HSC  google
एज्युकेशन जॉब्स

HSC result : येथे पाहा बारावीचा निकाल

राज्य शिक्षण मंडळाकडून अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात येत नव्हती. अखेर शालेय शिक्षण मंत्र्यांनी दुपारी ट्विट करत यावर शिक्कामोर्तब केले.

नमिता धुरी

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (ता.८) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. त्यामुळे बारावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा बुधवारी अखेर संपणार आहे.

या परीक्षेसाठी राज्यातील १४ लाख ८५ हजार १९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी आठ लाख १७ हजार १८८ विद्यार्थी आणि सहा लाख ६८ हजार ३ विद्यार्थिनी आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळामार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण बुधवारी दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य मंडळाच्या बारावीच्या निकालाची अधिकृत घोषणा मंगळवारी दुपारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून केली.

मंगळवारी सकाळपासूनच वेगवेगळ्या सोशल मीडिया साइटवर बुधवारी बारावीचा निकाल जाहीर होणार, याबाबत माहिती व्हायरल होत होती. मात्र, याबाबत राज्य शिक्षण मंडळाकडून अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात येत नव्हती. अखेर शालेय शिक्षण मंत्र्यांनी दुपारी ट्विट करत यावर शिक्कामोर्तब केले.

निकाल येथे पाहता येणार :

- mahresult.nic.in

- hscresult.mkcl.org

- mahresults.org.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अर्पण केली श्रद्धांजली, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठांत शुकशुकाट

Ajit Pawar :...ही दादांची सभा नव्हे दोस्ता, अखेरच्या निरोपाची वेळ आहे! विविध रंगछटा व हास्यमुद्रेतील दादांचे १२ फ्लेक्स पाहून कार्यकर्ते गहिवरले

T20 World Cup 2026 जिंकून सूर्यकुमारच्या नेतृ्त्वात टीम इंडिया इतिहास घडवणार? रवी शास्त्री म्हणाले, '१० मिनिटांचा खेळ...'

Pune Crime : सेवानिवृत्त मेजरची एक कोटीची फसवणूक; केअर टेकरसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT