Charity 
एज्युकेशन जॉब्स

चॅरिटी करण्याचे आहेत पाच फायदे

अनेक लोकं नियमितपणे धर्मादाय संस्थांना देणग्या देतात

सकाळ डिजिटल टीम

तुम्‍ही देणगी (charity) दिल्याने केवळ धर्मादाय संस्थांनाच फायदा ( Benifits) होत नाही, तर ते तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते. अनेक लोकं नियमितपणे धर्मादाय संस्थांना देणग्या देतात. या देणग्यांमुळे गरजूंना मदत तर मिळतेच तसेच तुम्ही ती देणार असाल तर तुमच्याही आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. म्हणून चॅरिटी किंवा देणगी देणे अनेकांना महत्वाचे वाटते. त्याची काही कारणे आहेत.

Charity

असे आहेत फायदे

१) तुम्हाला देणगी दिल्याने समाधान वाटू शकते. तुम्ही दुसऱ्यांना मदत करत आहात ही भावना खूप परिपूर्ण करणारी असते. अशी देणगी दिल्याने तुमच्या मेंदूच्या कार्यप्रणालीवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो, असे संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही sakal relief fund अधिक माहिती मिळवू शकता.

२) देणगी देण्याने लोकांना त्यांची वैयक्तिक मूल्ये मजबूत करता येतात. तसेच देणगी देणे त्यांना आपले नैतिक कर्तव्य वाटते. त्यामुळे अनेक लोक स्वच्छेने देणगी तर देतातच शिवाय ते अशा लोकांचा, मुलांचा शोधही घेत असतात.

३) धर्मादाय करण्यासाठी त्यांच्या देणग्या कर किंवा प्रशासकीय खर्चामुळे कमी केल्या जाण्याची शक्यता असते. त्यामुळे लोक चिंतीत आहेत. पण जर खरी मदत करायची असेल तर तशा संस्थाही तुम्हाला योग्य सल्ला देऊन तुमची मदत स्विकारण्यास तयार असतात.

४) तुमच्या मुलांनाही या कार्यात सहभागी करून घेतल्यास त्यांच्यातही दुसऱ्यांविषयी काळजी, मदतीची भावना निर्माण होईल. मुलांना मदत करणे आवडते. त्यामुळे तेही पैसे साठवून तशी मदत इतरांना करायला तुम्हाला मदत करू शकतात. पुढे मोठी झाल्यावर त्यांच्यात ही भावना वाढीस लागण्यास मदत होईल.

५) तुमच्या दुसऱ्यांना देणगी देऊन मदत करण्याच्या कृतीचा दृष्टीकोन तुमच्या नातलग आणि मित्र-मैत्रिणींना कळल्यावर तेही अशा कार्यात मदत करायला नक्कीच पुढे येतील. ज्यांना मदतीची गरज आहे अशांसाठी लाखो हात पुढे येणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही sakal relief fund अधिक माहिती मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT