wipro  Sakal
एज्युकेशन जॉब्स

Wipro Layoff : तुमची कामगिरी चांगली नाही; ४५२ फ्रेशर्सना विप्रोकडून नारळ

आर्थिक मंदीच्या भीतीमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचं हत्यार उपसलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Wipro Layoff : आर्थिक मंदीच्या भीतीमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचं हत्यार उपसलं आहे.

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

सर्वाधिक कर्मचारी कपातीची घोषणा दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांकडून करण्यात आली आहे. शुक्रवारी गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने १२ हजार कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

त्यानंतर आयची क्षेत्रातील दिग्गज कंपनीने विप्रोनेही कर्मचारी कपात केली आहे. तुमची कामगिरी चांगली नसल्याचे कारण पुढे करत विप्रोने ४५२ फ्रेशर्सना कामावरून काढत घरचा रस्ता दाखवाल आहे.

प्रशिक्षण देऊनही हे कर्मचारी वारंवार खराब कामगिरी करत असल्याने ही कर्मचारी कपात केल्याचे कंपनीकडून नमुद करण्यात आले आहे. फ्रेशर्सने कंपनीने ठरवून दिलेल्या मानांकनानुसार काम करावे हीच आमची अपेक्षा आहे.

दरम्यान, या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या टर्मिनेशन लेटरमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रशिक्षणासाठी करण्यात आलेला प्रति कर्मचारी साडेसात हजारांचा खर्च माफ केला आहे.

दिग्गज कंपन्यांकडून कर्मचारी कपात सुरूच

जगभरात आर्थिक मंदींची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याच गोष्टीची दखल घेत जगभरातील अनेक दिग्गज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने जगभारातील १२ हजार कर्मचारी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

याशिवाय अॅमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टनेदेखील 25,000 हून अधिक कर्मचार्‍यांची कपात जाहीर केली आहे. तसेच स्विगीने ३८० कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Airstrikes Iran : शस्त्रसंधी फसली! अमेरिकेचे इराणवर पुन्हा हवाई हल्ले, इराणचे अस्तित्व संपवण्याचा ट्रम्प यांचा इशारा

Samosa: खुसखुशीत बाहेरचा थर अन् आत खव्याचा गोडवा... या समोशाची गोष्टच वेगळी, रविवारच्या भारी ब्रेकफास्टची खास रेसिपी

Pune News: काठमांडूमध्ये दोनशे भाविक अडकले! पुण्यातील ५२ जणांचा समावेश, परवाने मिळूनही चीनकडून व्हिसा नाही

EWS Flats: फक्त ३ लाखांत मिळणार फ्लॅट! एका अर्जातून बदलणार हजारो कुटुंबांचे आयुष्य; उत्तराखंडमध्ये घरांची मोठी संधी

आजचे पंचांग 28 जून 2026! वटसावित्री व्रताचा दुसरा दिवस, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि दिनविशेष एकाच ठिकाणी

SCROLL FOR NEXT